केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भाजपाबरोबर येण्याची ऑफर दिली आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो,” असं रामदास आठवले म्हणाले.

“३२ राज्यात रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. प्रत्येक राज्यात पक्ष वाढवण्याचं काम सुरू आहे. आपल्याला महाविकास आघाडीबरोबर संघर्ष करायचा आहे. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बाजूने असतो, त्यांनाच सत्ता मिळते. प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकर सांगतात की वंचित आघाडी ज्यांच्याबरोबर असते, त्यांना सत्ता मिळते. वंचित आघाडी स्वत:च्या जीवावर निवडणूक लढते आणि पडतात,” असं रामदास आठवलेंनी म्हटलं.

Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Prakash Ambedkar on RSS PM Narendra Modi Mohan Bhagwat
‘RSS ने आम्हाला साथ द्यावी’, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन; म्हणाले, “मोदी संघाच्या मानगुटीवर…”
Sanjay Raut Prakash ambedkar
वंचित बहुजन आघाडीसह युती तुटली? संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर…”
sanjay raut prakash ambedkar (3)
वंचितची मविआबरोबरची युती फिस्कटली? संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांच्या मनातली नाराजी…”

हेही वाचा : “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

“उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही”

“वंचित आघाडीच्या पाठिंब्याने कोणाची सत्ता आली नाही. माझ्या पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो. आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींबरोबर राहुया. उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही,” असं रामदास आठवलेंनी सांगितलं.

हेही वाचा : कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना ओढून, कोंबून…”

“मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे”

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये. ते कसे आहेत, मला माहिती. त्यामुळे मी भाजपाबरोबर आलो आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे महायुतीत आले, तर स्वागतच आहे. तसेच, महिला, दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.