Premium

“प्रकाश आंबेडकरांनी इकडं तिकडं फिरू नये, मी तुम्हाला…”, रामदास आठवलेंनी दिली ऑफर

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये. ते कसे आहेत…”, असेही रामदास आठवलेंनी सांगितलं.

prakash ambedkar ramdas athawale
रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भाजपाबरोबर येण्याची ऑफर दिली आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो,” असं रामदास आठवले म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“३२ राज्यात रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. प्रत्येक राज्यात पक्ष वाढवण्याचं काम सुरू आहे. आपल्याला महाविकास आघाडीबरोबर संघर्ष करायचा आहे. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बाजूने असतो, त्यांनाच सत्ता मिळते. प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकर सांगतात की वंचित आघाडी ज्यांच्याबरोबर असते, त्यांना सत्ता मिळते. वंचित आघाडी स्वत:च्या जीवावर निवडणूक लढते आणि पडतात,” असं रामदास आठवलेंनी म्हटलं.

हेही वाचा : “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

“उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही”

“वंचित आघाडीच्या पाठिंब्याने कोणाची सत्ता आली नाही. माझ्या पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो. आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींबरोबर राहुया. उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही,” असं रामदास आठवलेंनी सांगितलं.

हेही वाचा : कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना ओढून, कोंबून…”

“मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे”

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये. ते कसे आहेत, मला माहिती. त्यामुळे मी भाजपाबरोबर आलो आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे महायुतीत आले, तर स्वागतच आहे. तसेच, महिला, दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar alliance with bjp say ramdas athawale in shirdi ssa