Prakash Ambedkar On Alliance :मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव ठाकरे गट यांच्यात युती झाल्याचे म्हटले जात आहे. युती झालेली असून आम्ही आगामी निवडणुका सोबत लढणार आहोत, असे वंचितच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान, एकीकडे या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले होते. दरम्यान, या भेटीबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक भेटीत राजकीय विषय नसतो, असे आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवरही भाष्य केले आहे. ते आज (१२ जानेवारी) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >> गिरीश महाजनांच्या ‘त्या’ विधानानंतर शिंदे गटाचे संजय गायकवाड आक्रमक, म्हणाले “कोणी मुर्खासारखे…”

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

प्रत्येक भेट राजकीय नसते

“सध्या सगळीकडेच संभ्रमाची स्थिती आहे. आमचा शिवसेनेसोबत (उद्धव ठाकरे) जाण्याचा विचार आहे. आपण या चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर सांगू, असा आम्ही त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता. आता युती कधी जाहीर करायची हे शिवसेनेने ठरवायचे आहे. ही युती जोपर्यंत जाहीर होणार नाही, तोपर्यंत अनेक तर्क लावले जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत भेट होणारच आहे. मात्र प्रत्येक भेट ही राजकीय आहे, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते. अन्यथा नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> ‘धर्मवीर’ वादावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली! अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले “दाढी काढल्यावर त्याला…”

मी काँग्रेस, राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारे ओळखतो

“उद्धव ठाकरे यांनी युतीचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. महापालिका निवडणुकीमध्ये आमची युती झालेली आहे. मात्र ती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. आम्ही एकमेकांना शब्द दिलेला आहे. आम्ही चार भिंतीच्या आत हे शब्द दिलेले आहेत. आता ही युती कधी जाहीर करायची ते उद्धव ठाकरे यांनी ठरवायची आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सोबत घ्यायचे आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ, असेही त्यांनी सांगितलेले आहे. मी काँग्रेसला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. माझ्याएवढा काँग्रेस आणि शरद पवार यांना चांगल्या प्रकारे ओळखणारा राज्यात दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. शिवसेनेने थांबू नये, असा संदेश आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेला आहे,” असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>“…तर आमच्यात चर्चा होऊ शकते,” एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान!

निवडणुका जोपर्यंत घोषित होणार नाहीत तोपर्यंत…

“शिवसेना आणि वंचित यांच्यात युती होणार, हे नक्की आहे. शिवसेना पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना सोबत घेतल्यानमंतर भाजपाविरोधातील लढाई सोपी जाईल, असे त्यांना वाटते. निवडणुका जोपर्यंत घोषित होणार नाहीत, तोपर्यंत उद्धव ठाकरे त्या दोन्ही पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील,” अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.