scorecardresearch

Premium

“आरक्षण देणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान

प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली.

prakash ambedkar (4)
प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली

मागील चार-पाच दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देत हा लढा असाच सुरू ठेवा, असं सांगितलं.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी हा लढा सुरू ठेवण्यासाठी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. हा लढा एक दिवसाचा नसतो, हे आपण महात्मा गांधींपासून पाहत आलो आहे. स्वातंत्र्याचा लढाही अनेक दिवस चालला. ब्रिटनमध्ये जोपर्यंत चर्चिल सत्तेत राहतील तोपर्यंत भारताला स्वातंत्र मिळणार नाही, असं इंग्लंडमध्ये सांगितलं जात होतं. त्यानंतर चर्चिल हरले, आणि सत्तेत अॅटली आले. सत्तेत आल्यानंतर अॅटलींनी सांगितलं, आम्ही भारताला स्वातंत्र देऊ आणि भारताला स्वातंत्र मिळालं.”

elgar parishad to reduce tension between maratha and obc community prakash ambedkar claim before commission
Maharashtra Breaking News : “ग्रामसेवक भरतीतून टीसीआय कंपनीला १२० कोटी रुपयांचा फायदा”, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, म्हणाले…
jayant patil prakash ambedkar
“…तर पळून जाऊन लग्न करा”, जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
Prakash Ambedkar
“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात…”, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
Prakash Ambedkar on BJP MP Congress
“संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल, म्हणाले…

हेही वाचा- “मराठा आंदोलकांवरील हल्ला फडणवीसांनीच घडवला”, माजी खासदाराचा खळबळजनक आरोप

“आपल्यालाही अशीच वाटचाल करावी लागेल. येथील व्यवस्थेला आणि न्यायालयालाही तुम्ही अंगावर घ्यायला, तुम्ही शिकलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही येथील व्यवस्थेला आणि न्यायालयाला अंगावर घ्याल, त्यादिवशी तुम्ही ज्या प्रश्नासाठी लढत आहात, तो प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा- “…तर मी राजकारण सोडेन”, अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

“राज्यघटनेमध्ये असं कुठेही नमूद केलं नाही की, अमूक समाजाला आरक्षण देता येणार नाही. कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की, एखाद्या समाजाला आम्ही आरक्षण देणार नाही, असं म्हटलं नाही. पण आरक्षण देताना संबंधित वर्गाला खरंच आरक्षणाची गरज आहे का? हे सरकारने सिद्ध करावं. शासनाने तसं सिद्ध केलं, तर त्यांना आरक्षण देण्यात आमचा कुठेही हस्तक्षेप नसेल”, असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar meet manoj jarange patil maratha reservation protest jalna rmm

First published on: 05-09-2023 at 15:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×