कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी या रिफायनरीचं समर्थन करत आहेत. तर विरोधक बारसूतल्या ग्रामस्थांशी बोलून विषय सोडवावा या भूमिकेत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या रिफायनरीला थेट विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर शनिवारी रात्री माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इतकंच सांगतो की, कोकणाची वाट लावू नका.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही आमचा विरोध होता. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका. बारसूबद्दलच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल आंबेडकर म्हणाले की, राज्यातले नेते केंद्रातून फोन आल्यावर त्यांच्या भूमिका बदलतात. नंतर म्हणतात ही भूमिका आमची नाही. आंबेडकर म्हणाले, मुळात कोकण हे लाईफ सेंटर आहे. इथे मिळणारा ऑक्सिजन हा १०० टक्के शुद्ध आहे.

Narendra Modi and prakash ambedkar
“भारतीय मुसलमान घुसखोर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका; काँग्रेसलाही केलं लक्ष्य!
Vijay Wadettiwar criticize dr Prakash Ambedkar in nagpur
“हुंडा न मिळाल्याने लग्न तुटले असावे,” विजय वडेट्टीवार यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर खोचक टीका; म्हणाले…
sanjay raut prakash ambedkar tweet
“वंचितच्या पाठित खंजीर खुपसलात’, प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला; मविआतल्या अंतर्गत बाबी जाहीर करत म्हणाले…
PRAKASH AMBEDKAR
मविआला धक्का; प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान बांधत उमेदवारांची घोषणा

हे ही वाचा >> Bhiwandi Building Collapsed: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; ९ जखमी, दहा-बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे लोक (सत्ताधारी) म्हणतात, बारसूत रिफायनरी बनल्याने रोजगार मिळतील. येथे इंडस्ट्री येऊन इथल्या लोकांचा रोजगर वाढेल. परंतु त्यापेक्षा कोकणातील नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलं तर कोकणातील लोकांचा व्यापार वाढेल. त्यावर चालणारे उद्योग वाढतील. त्यांना पाठबळ दिलं तर तेलंगणाच्या लोकांचा मासिक उत्पन्न वाढलं तसंच कोकणातील लोकांचंही वाढेल.