Premium

“औरंगजेब याच मातीतला”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर, म्हणाले…

अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

मुघल बादशाह औरंगचेबाचे पोस्टर आणि सोशल मीडिया स्टेटसवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. अहमदनगरच्या फकीरवाडा भागात रविवारी (०३ जून) संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाचे पोस्टर झळकावत काही तरुणांनी नाच केला. तसेच या मिरवणुकीत त्यांनी घोषणाबाजी केल्याचाही आरोप केला जात आहे. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी कोल्हापुरातही मोठा राडा झाला आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. तसेच कोल्हापुरात या घटनेमुळे अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही घटनांवरून राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांना आज एका पत्रकार परिषदेवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी औरंगजेब पोस्टर आणि सोशल मीडिया स्टेटस प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आंबेडकर म्हणाले, औरंगजेब या मातीतला आहे. औरंगजेब कुठून पैदा झाला असं विचारत आहेत, दुसरीकडे कुठे पैदा झाला असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी सांगावं.

हे ही वाचा >> शरद पवारांना आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादीचा मुनगंटीवार, राणे-पडळकरांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्या ट्विटर अकाऊंट्सचे…”

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणूनबुजून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न काहीजण करत आहेत. हे कोण करत आहे ते तपासून बघावं लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. फडणवीसांच्या याच वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील तणावावर बोलताना फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 20:41 IST
Next Story
तुकोबा आणि माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी पोलिसांनी कसली कंबर; ४ हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त