दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दोन दिवसांपूर्वी (२९ मे) पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. तसेंच केंद्रातल्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. परंतु या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले होते.
महाराष्ट्र सदनात घडलेल्या त्या घटनेमुळे देशभरातून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस
या घटनेचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. कारण महाराष्ट्र सदनात जे घडलं तो ओबीसींचा अपमान आहे. भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात. तसेच ज्या महाराष्ट्र सदनात हा प्रकार घडला ते सदन छगन भुजबळ यांनी बांधलं आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा.
हे ही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या गाठीभेटी वाढण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले…
रुपाली चाकणकर यांची राज्य सरकारवर टीका
महिल्या आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे.”
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.