बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाला थेट युतीची ऑफर दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आंबेडकर यांनी सध्या सत्तेत असणाऱ्या शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयामधील निकालाचा संदर्भ देत आंबेडकरांनी राज्यातील स्थिती ही अस्थिर असल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “माझा भाऊ कॉप्या करुन…”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, “राज्यातलं राजकारण पूर्णपणे अस्थिर आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अजून हा खुलासा झालेला नाही की आमदार अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी निर्णय घेऊन नये यावर दिलेला परिस्थिती जैसे ठेवण्याचा निर्णय उठवण्यात आला आहे की नाही. हा निर्णय उठवण्यात आला आहे की नाही हे कळण्याचा मार्ग नसल्याने १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला आहे की नाही हे कळत नाहीय. सगळं अगंतुक ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व राजकारण अस्थिर असल्याची परिस्थिती आहे,” असं आंबेडकर म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”

शिंदे सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली पण सरकारकडे निधीच नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. “वल्गना या सरकारकडून फार मोठमोठ्या होतात. साधं आहे शेतकऱ्यांचं पीक नुकसान झालं. मागच्या २० तारखेला देणार असं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही लवकरात लवकर मदत करु अशी घोषणा केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न करु असं म्हणाले. पण यांच्याकडे निधीच नाही तर हे देणार कुठून अशी सध्याची परिस्थिती आहे,” असं आंबेडकर म्हणाले.

नक्की वाचा >> “आमचे चुलत भाऊ राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या…”; थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारला टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबेडकर यांना ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आंबेडकर यांनी, “आम्ही युतीसाठी तयार आहोत. रेखाताई ठाकूर ज्या आमच्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी महिन्याभरापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. आम्ही दोन पक्षांसोबत युती करायला तयार आहोत. एक काँग्रेस आणि दुसरा पक्ष शिवसेना. पण दोघांकडून अजून कसलंही उत्तर आलेलं नाही,” असं म्हटलं.