२०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, “उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला.

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
baramati lok sabha marathi news, sharad pawar reply to ajit pawar marathi news
शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार : म्हणाले, ‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद…’
PRAKASH AMBEDKAR
मविआला धक्का; प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान बांधत उमेदवारांची घोषणा

हेही वाचा : “…मग वाघाच्या जबड्यात हात घालणारे अटकेला का घाबरत होते?”; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानाबद्दल प्रकाश आंबेडकरांना प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर आंबेडकर म्हणाले, “अजित पवारांनीही तिच भूमिका मांडली होती. मला एकट्याला कशाला दोष देत आहात, माझ्या पक्षाचा निर्णय होता. त्यामुळे आम्ही सांगत होतो, लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावित्रीशी… हे मांडलेलं खर ठरलं,” असा टोला प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लगावला आहे.

हेही वाचा : “तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना?”, सुप्रिया सुळेंनी ‘ED सरकार’ म्हणत केली टीका

“असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची…”

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती.