पॅरिस करारावर स्वाक्षरी करताना भारताने २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आश्वासन दिले होते. २०२० पूर्वी हवामानकृ ती लक्ष्य साध्य करणे हा या आश्वासनातील पहिला टप्पा होता. व्यावहारिकदृष्टय़ा हे लक्ष्य भारताने साध्य के ले आहे. . केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

युनायटेड नेशन्स फ्रे मवर्क कन्वेन्शन ऑन क्लायमॅट चेंजच्यावतीने जागतिक पर्यावरण परिषदेदरम्यान २२ एप्रिल २०१६ ला पॅरिस करार करण्यात आला. त्यानंतर २ ऑक्टोबर २०१६ ला भारताने त्यावर स्वाक्षरी के ली. करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये दोन टक्क्याहून अधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांचा समावेश होता. अमेरिके ने या करारातून माघार घेतली होती. स्वाक्षरी करताना भारताने हवामानबदलासाठी कारणीभूत ठरणारा कार्बन कमी करण्याचे आश्वासन दिले होते. २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आश्वासन भारताने दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी ४० टक्के ऊर्जास्रोत हे सौर, पवन, बायोमास ऊर्जेवर आणावे लागणार आहेत. २०२० पूर्वी हवामानकृ ती लक्ष्य साध्य करण्याचा आश्वासनातील पहिला टप्पा होता आणि ते लक्ष्य भारताने साध्य के ले आहे

  • केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘इंडिया क्लायमॅट चेंज नॉलेज पोर्टल’ सुरू केले आहे.
  •  या माध्यमातून हवामानविषयक समस्येवर लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व प्रमुख उपक्र मांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.
  •  हे पोर्टल म्हणजे एका क्लिकवर माहिती मिळवण्यासाठीचे मोठे स्रोत आहे. भारताच्या हवामानाची ओळख, राष्ट्रीय धोरण चौकट, भारताचे राष्ट्रीय निर्धारित योगदान लक्ष्य, अनुकू लन कृ ती, शमनक्रि या, द्विपक्षीय अणि बहुपक्षीय सहकार्य, आंतरराष्ट्रीय हवामान वाटाघाटी, अहवाल आणि प्रकाशने असे या पोर्टलचे आठ विभाग आहेत.