scorecardresearch

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रणिती शिंदे यांना स्थान

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने एकूण ३० स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे.

Praniti Shinde among Congress star campaigners for Uttar Pradesh elections

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून त्यात आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही स्टार प्रचारक म्हणून समोर आणण्यात आले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने एकूण ३० स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे.

ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वडेरा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह गुलामनबी आझाद, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सलमान खुर्शीद, भुपेंद्रसिंग हुडा, सचिन पायलट, प्रमोद तिवारी, हार्दीक पटेल आदींची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

यात सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे स्टार प्रचारक म्हणून निवडले जात होते. पण त्यांची राजकीय वाटचाल आता निवृत्तीच्या दिशेने होऊ लागली असून त्यांच्या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे यांना स्थान देण्यात आल्याचे दिसून येते. सध्या प्रणिती शिंदे प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांचे महत्त्व राखण्यात आल्याबद्दल सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. तर चर्चेत असलेले चेहरे कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल यांचाही नावे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या प्रचाराकडे सर्वांचेच लक्ष आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Praniti shinde among congress star campaigners for uttar pradesh elections abn

ताज्या बातम्या