अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रशांत नाईक

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनची संस्था नोंदणीकृत करण्यात आली.

 

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनची संस्था नोंदणीकृत करण्यात आली. या संस्थेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अध्यक्षपदी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक व उपाध्यक्षपदी अ‍ॅड. गौतम पाटील व नितीन अधिकारी यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहेत.

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनची निवड गुरुवारी झाली. यामध्ये १३ जणांची कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली होती. अध्यक्षपदी प्रशांत नाईक, उपाध्यक्षपदी अ‍ॅडं. गौतम पाटील, नितीन अधिकारी, कार्याध्यक्षपदी प्रदीप नाईक, उपकार्याध्यक्षपदी अरुण पाटील, सचिव प्रकाश पावसकर, सहसचिव प्रताप गंभीर, संजय चव्हाण, खजिनदार सुनील पेडणेकर, सदस्य अभय घरत, संदीप जोशी, सल्लागार सदस्यपदी अ‍ॅड्. अशीष रानडे, सदस्य तस्लीम कुतुबुद्दीन कप्तान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलिबाग क्रिकेट असोसिशनमार्फत अलिबागमधील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prashant naik selected as a alibag taluka cricket association president