आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कधीही निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी परिस्थिती आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या राजकीय पक्षांकडून युती, आघाडी आणि उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहेत. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला, तसेच चित्र विधानसभेतही असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, आगामी विधानसभेत आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.

Anjali Damania and ajit pawar
Anjali Damania : “राज्याचे अर्थमंत्री दहावी पास अन् क्लर्कसाठी…”, अंजली दमानिया यांची अजित पवारांवर टीका
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

हेही वाचा – Creamy Layer : “अनुसूचित जातींचे आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट”, क्रिमीलेअरबाबत प्रकाश आंबेडकरांची सूचक पोस्ट

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देणार नाही. वंजित बहुजन आघाडी आणि आमच्या आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनाच आम्ही पाठिंबा देऊ”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

“विधानसभेत आमचा कोणालाही पाठिंबा नसेल”

यावेळी बोलताना, वंचित आघाडीने लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेसला पाठिंबा देणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना, “तेव्हा काँग्रेसने फोन करून आमच्याकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, यावेळी असं काहीही नाही. विधानसभेत आमचा कोणालाही पाठिंबा नसेल. वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे केवळ आमच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ, दुसऱ्या कोणालाही नाही”, असं त्यांनी सांगितलं.

“कोण मोठा-कोण लहान हे जनता ठरवते”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले, यांच्यासारखे राज्यातल्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात उमेदवार देणार का? असं विचारलं असता, “कोण मोठा आणि कोण छोटा हे जनता ठरवत असते. संबंधित मतदारसंघात जे कोणी इच्छूक उमेदवार असेल, त्यांचा अभ्यास करून आम्ही योग्य उमेदवार देऊ. तो मोठा आहे की लहान, हे आम्ही बघणार नाही”, असे त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी, विधानसभेआधी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न, दोन मोठ्या नेत्यांना ऑफर

प्रकाश आंबेडकरांकडून वेगळ्या आघाडीचा प्रयत्न

महात्त्वाचे म्हणजे प्रकाश आंबेडकर हे गेल्या दिवसांपासून वेगळी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ आणि माकप यांना नव्या आघाडीत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. “छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर यावं असं आम्हाला वाटतं”, असंही आंबेडकर म्हणाले होते. तसेच माकप बाबत बोलताना, माकपने महाराष्ट्रात आमच्याबरोबर यावं. मी केरळ किंवा पश्चिम बंगालमधल्या माकपबद्दल बोलत नाही. तर महाराष्ट्रातील माकपबद्दल बोलतो आहे. सध्या मी त्यांचा काडीमोड होण्याची वाट पाहणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती.