“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं” असं म्हणत मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेवर ‘लेटरबॉम्ब’ टाकणारे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे गटासोबत जाऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ठाणे महानगरपालिकेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सरनाईक यांनी त्या पत्राचा संदर्भ दिला. तसेच आपणही रिक्षा चालवायचो असं सांगतानाच ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री तर हा डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार असल्याचंही ते म्हणाले.

नक्की वाचा >> ठाण्यातील सेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत; विरोधात आहे एकमेव महिला नगरसेवक कारण…

“उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री आहे तरी कामं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त होतायत, असं सगळ्या आमदारांचं म्हणणं होतं,” असं प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बंडासंदर्भात बोलताना म्हटलंय. तसेच पुढे बोलताना याच मुद्द्यावरुन, “मी पत्र दिलं होतं. तेव्हा त्याची दखल घेतली नव्हती,” असंही सरनाईक म्हणाले. पुढे बोलताना सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपला राजकीय प्रवास ठाणे महानगरपालिकेमधूनच सुरु झाल्याचं सांगितलं. “शिंदे आणि माझी राजकीय वाटचाल एकत्र सुरु झाली कारण १९९७ साली आम्ही दोघेही याच महानगरपालिकेचे नगसेवक म्हणून पहिल्यांदा निवडूण आलेलो. त्यानंतर त्याची चढती कमान वाढत गेली आणि आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले,” असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा

“डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांना आता चांगले दिवस यायला लागलेत असं मला म्हणावंसं वाटतं,” असंही यावेळेस सरनाईक यांनी म्हटलंय.

सरनाईकांच्या त्या पत्रात काय होतं?
२० जून २०२१ रोजी समोर आलेल्या सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय खळबळ उडाली होती. या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. “या परिस्थितीमधे जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल”, अशी थेट मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

केंद्रीय यंत्रणांबद्दल केलेली तक्रार
या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रार केली होती. “कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही कुठेतरी आळा बसेल, आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुटुंबियांवर सुद्धा सतत आघात होत आहेत. खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला, की दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवणे असे प्रकार होत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे थांबेल”, असं सरनाईक यांनी नमूद केलं होतं.

नक्की पाहा >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”

pratap sarnaik letter

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण शिंदेंनी ‘करुन दाखवलं!’

नेत्यांचे संबंध चांगले
प्रताप सरनाईक यांनी या पत्रामध्ये युती तुटल्यानंतरही नेत्यांचे संबंध चांगले असल्याचं नमूद केलं होतं. “पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल”, असं देखील या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.