दसरा मेळावा जवळ येत असताना, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

हेही वाचा – “सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

MP Dr Srikant Shinde criticizes Uddhav Thackeray thane
एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिलाय; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
nandurbar, aadiwasi melava, shivsena, shinde group, vijaykumar gavit, bjp, displeasure, dada bhuse, shrikant shinde, eknath shinde, devendra fadanvis, lok sabha elctions,
नंदुरबारमधील भाजपविरुद्धचा वाद शिंदे, फडणवीस यांच्यापुढे…शिवसेना मेळाव्यात दादा भुसे काय म्हणाले ?
tejashwi yadav janvishvas yatra
दहा दिवस अन् ३३ जिल्हे! NDA ला रोखण्यासाठी RJD ची ‘जनविश्वास यात्रा’; तेजस्वी यादव यांना यश येणार का?
Ajit Pawar nephew yogendra pawar
अजित पवारांच्या कुटुंबातीलच व्यक्ती आता मैदानात; सख्खा पुतण्या म्हणतो “शरद पवार साहेब म्हणतील तसं..”

काय म्हणाले प्रतापराव जाधव?

नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमात मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले. “अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते”, असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा – दसरा मेळावा : “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…” ; बावनकुळेंचं विधान!

दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांच्या या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना ‘५० खोके एकदम ओके’, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात येत होता. मात्र, आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच “शंभर खोके एकदम ओके” असा टोला लगावला आहे.

किशोरी पेडणेकरांचे जाधवांना प्रत्युत्तर

दरम्यान, “जाधवांच्या या आरोपाला शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. शिंदे गटातील आरोपांचा आता कंटाळा यायला लागला आहे. अगदी निचपणे हे आरोप सुरू आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे शोधावे लागेल. जो उठतो तो स्क्रिप्ट घेऊन बोलतो आहे. त्यामुळे यांच्या आरोपाला आम्ही काहीही उत्तर देणार नाही”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.