विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी भाजपाचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. पण प्रविण दरेकर यांनी भाजपाच्या या दिग्गजांना मागे टाकत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद मिळवले आहे.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरुनही विरोधी बाकावर बसणाऱ्या भाजपासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्वाचे पद आहे. या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर यांचे नाव कालपासून आघाडीवर होते. पण अखेरच्या क्षणी प्रविण दरेकर यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे. आपल्या जोरदार भाषणांनी धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद हलवून सोडली होती. आता तशीच अपेक्षा प्रविण दरेकर यांच्याकडून असेल.

dhule aimim mla shah faruk anwar marathi news
“भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट”, एमआयएमचे आमदार फारुक शाह यांची भूमिका
wardha lok sabha
वर्धा : शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा पक्षप्रवेश, उमेदवारीवर शिक्कामोर्तब
Rebellion in the Mahavikas Aghadi as well as Mahayuti Shiv Senas Dinesh Bub is Prahars candidacy
महायुती सोबतच महाविकास आघाडीतही बंडखोरी! शिवसेनेच्या दिनेश बुब यांना प्रहारची उमेदवारी
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

शिवसेना, मनसे ते भाजपा प्रविण दरेकर यांचा राजकीय प्रवास
प्रविण दरेकर यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्द सुरु केली. ते राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. पुढे राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर ते मनसेमध्ये आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते २०१४ पर्यंत ते आमदार होते. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांना तिकीट मिळाले नाही. प्रविण दरेकर यांच्याकडे सहकारी क्षेत्रातील कामाचा दाणगा अनुभव आहे.