सातारा जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पराभवानंतरची आपली भूमिका जाहीर केली, शिवाय यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका देखील केल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, “काहीजण म्हणत होती की पहिले आमच्याकडे ३५-३७ मत आहेत. काही मग ३५ वर आली, नंतर २८ वर आली, माझ्याकडे १७-१८ मत होती. मी ती २४ पर्यंत नेली याचा अर्थ, मी अप्रत्यक्षरित्या सर्वांनी ताकद लावून देखील शेवट्या क्षणाला विजयी होण्याच्या जवळ गेलो, हा माझा नैतिक विजय आहे. एक मताचा फरक झाला, दोन मत मी त्या परिस्थितीत देखील नियोजित केली होती. आता आमच्यातील का बाहेरून आलेलं, हे कोण झालं… हे मला सांगता येणार नाही. मी दिलदारपणाने पराभव स्वीकारला. विजयी उमेदवारांची मी स्वतः अभिनंदन केलं. मतदार बूथ वर देखील मी हसतखेळत निवडणूक पार पाडली.”

माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार, हे त्यांचंच षडयंत्र – शशिकांत शिंदे

याचबरबरोबर, “काहींनी आरोप केला की गुंडगिरीच्या माध्यमातून निवडणूक केली गेली. मी आताही सांगतो अगदी गोव्यापासून ते तिरुपती, मैसूर, उटी, विशाखापट्टणम आणि गणपतीपुळे या ठिकाणी मी सगळीकडे पोहचलो होतो. मनात आणलं असतं तर १०० टक्के सगळेच्या सगळे उमेदवार आम्ही ताब्यात घेतले असते आणि जे माझ्याबरोबर होते, त्यांना मी घेऊन आलो होतो. माझं एक तत्व आहे, माझ्या नेत्याने आणि ती दुसरी बैठक अजित पवार यांच्यासमोर पुण्यात झाली होती. त्या बैठकीत देखील अजित पवार यांनी सांगितलं होतं की, जावळीतून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित करून टाका. शरद पवार, अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे, शरद पवार यांनी देखील याबाबतीत मकरंद पाटील, रामराजे असतील, शिवेंद्रसिंहराजे या सर्वांशी चर्चा केली आणि शशिकांत शिंदे यांना मदत करावी, अशाप्रकारची सूचना केली.” असे सांगून पुढे शशिकांत शिंदे यांनी, “जर मी अशाप्रकारची कुठली घटना केली असती, तर तो ठपका माझ्यावर परत ठेवला असता की आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो मिटवत असताना यांच्याकडून अशाप्रकारची चूक झाल्याने आम्ही त्यांना सहकार्य करू शकत नाही. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या चौकटीच्या आणि पक्षाच्या, पॅनलच्या नेत्यांच्या चौकटीबाहेर आलो नाही, हीच माझी केवळ चूक झाली असेल, परंतु तिथे माझा विश्वासघात झाला. कारण, ज्यांनी ही जबाबदारी घेतली होती त्यांनी मनापासून त्या उमेदवारांना मागे घेण्यासाठी प्रयत्न केला का?” असंही यावेळी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Press conference of mla shashikant shinde after the defeat in the election of satara district bank msr
First published on: 25-11-2021 at 21:02 IST