Price Of Petrol And Diesel In Maharashtra: दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडतो आहे. यादरम्यान अनेकदा रेल्वे रुळांवर पाणी साचते आणि वाहतूक ठप्प होऊन जाते. त्यामुळे अनेक जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतात. तुम्ही देखील आज दुचाकी किंवा चारचाकी घेऊन घराबाहेर पडणार असाल तर आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे हे खाली दिलेल्या तक्त्यातून तपासून घ्या. काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दारात चढउतार पाहायला मिळत आहेत. तर आज मंगळवार २३ जुलै २०२४ रोजी तुमच्या शहरांत काय आहे पेट्रोल डिझेलचा दर पाहून घ्या. महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.२४९०.७७अकोला१०४.०५९०.६२अमरावती१०५.०६९१.५९औरंगाबाद१०५.३६९१.८४भंडारा१०५.०८९१.६१बीड१०५.५१९२.०१बुलढाणा१०५.१८९१.७०चंद्रपूर१०४.८८९१.४१धुळे१०४.८६९०.५३गडचिरोली१०४.८४९१.३८गोंदिया१०५.५६९२.०६हिंगोली१०५.३५९१.८६जळगाव१०५.४८९१.९६जालना१०५.८३९२.२९कोल्हापूर१०४.५१९१.०५लातूर१०५.७०९२.१८मुंबई शहर१०३.४४८९.९७नागपूर१०४.५२९१.०७नांदेड१०६.६२९३.०८नंदुरबार१०५.४२९१.९२नाशिक१०४.४८९१.००उस्मानाबाद१०४.८५९१.३८पालघर१०४.८६९१.३३परभणी१०६.३९९२.८६पुणे१०३.८७९०.४१रायगड१०४.०६९०.५६रत्नागिरी१०५.९३९२.४२सांगली१०३.९६९०.५३सातारा१०४.६१९१.१२सिंधुदुर्ग१०५.४७९१.९७सोलापूर१०४.७२९१.२४ठाणे१०३.७४९०.२५वर्धा१०४.८९९०.९९वाशिम१०४.८३९१.४२यवतमाळ१०५.६२९२.१३ कोणत्या शहरांत कामी व जास्त झाले पेट्रोल-डिझेलचे भाव ? आज महाराष्ट्रातील औरंगाबाद, भंडारा, जळगाव , कोल्हापूर, पालघर या शहरांत पेट्रोलची दरवाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर गडचिरोली, उस्मानाबाद, सातारा आदी शहरांत पेट्रोलचे भाव किंचित कमी झाल्याचे दिसून आले. तसेच कोल्हापूर, लातूर, नागपूर , नांदेड, पालघर, यवतमाळमध्ये डिझेलचे भाव वाढले असून बुलढाणा, धुळे, हिंगोली, सिंधुदुर्ग या शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण या शहरांत डिझेलचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळालं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत.रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले जातात. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दारात चढउतार दिसत आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. एमएमएसवर जाणून घ्या तुमच्या शहरातील दर : तुमच्या शहरातील दर तुम्ही एसएमएसद्वारे पुढील प्रमाणे जाणून घेऊ शकता. सगळ्यात पहिला ग्राहकाने पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.