हिंसक झालेल्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी बुधवारी केलेल्या रबरी गोळ्यांच्या माऱ्याने ४० हून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रुधुराची नळकांडीही फोडली. दरम्यान, आंदोलनाविरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर, बुधवारी शेतकरी नेत्यांनीही आडमुठेपणा सोडून देत चर्चेची तयारी दाखवली. परंतु, दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलेलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आबूधाबीत गेले असल्याने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने टीका केली आहे.

दिल्लीत सुलतानी तर महाराष्ट्रात अस्मानी संकट

“पंजाब-हरयाणातील शेतकरी न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीतील हुकूमशाही राजवटीला धडका देत आहेत. दिल्लीशहांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे. अर्थातच त्यांच्यावर हुकूमशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. त्यांचे दिल्लीचे मार्ग रोखण्यासाठी दडपशाहीचे सर्व मार्ग अवलंबले जात आहेत. अश्रुधूर, लाठीमाराचे तडाखे कमी पडले म्हणून की काय, रबरी गोळ्यांचादेखील मारा त्यांच्यावर करण्यात येत आहे. राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांविरोधात अशी सुलतानी सुरू आहे, तर महाराष्ट्रातील बळीराजावर अवकाळी, गारपिटीचे ‘अस्मानी’ संकट कोसळले आहे”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Atishi slams bjp
‘कथित मद्य घोटाळ्यातील पैसा भाजपाकडेच गेला, जेपी नड्डांना अटक करा’; ‘आप’ नेत्याचा खळबळजनक आरोप
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता

हेही वाचा >> शेतकऱ्यांवर रबरी गोळ्यांचा मारा; ४० आंदोलक जखमी, केंद्रीय मंत्र्यांची आज तोडग्यासाठी चर्चा

ना निसर्गावर भरवसा आणि नाही सरकारच्या आश्वासनांवर

“मागील काही वर्षांत अवकाळी, गारपीट आणि चक्रीवादळाचे तडाखे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नेहमीचेच झाले आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपिटीचा तडाखा. त्यात अधूनमधून चक्रीवादळाचाही फटका बसत असतो. त्यामुळे शेतातले पीक हातात येईलच, याचा कोणताच भरवसा शेतकऱ्यांना राहिलेला नाही. ना निसर्गावर भरवसा, ना सरकारच्या आश्वासनांवर. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि नगर जिल्ह्यांना अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने तडाखा दिला आहे”, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

सत्ताधारी फक्त विरोधकांना फोडण्यात मग्न

“राज्यातील सत्ताधारी नेहमीप्रमाणे सरकारी मदतीचे मोठे आकडे जाहीर करतील. मात्र शेतकऱ्यांना खरिपातील पीक विम्याचेच पैसे अद्यापि मिळालेले नाहीत. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळेल, याची खात्री कुठे आहे? पुन्हा केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी फक्त विरोधी पक्ष आणि नेत्यांना फोडण्यात मग्न आहेत. आगामी लोकसभा निवडणूक साम, दाम, दंड, भेद या मार्गांनी जिंकायची, त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडायची एवढेच त्यांचे लक्ष्य आहे. त्यांना ना शेतकऱ्यांना न मिळालेल्या खरिपाच्या नुकसान भरपाईची जाणीव आहे, ना आता गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या रब्बी हंगामाची”, असा घणाघातही ठाकरे गटाने केला.

चक्रव्युहातून शेतकऱ्यांची सुटका कशी होणार?

“शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या जुन्याच मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात नव्या लढाईचा एल्गार पुकारला आहे. त्यांच्यावर पोलिसी लाठ्या, रबरी गोळ्यांचा, अश्रुधुराचा मारा होत आहे तर महाराष्ट्रातील बळीराजा गारांचा आणि राज्यकर्त्यांच्या बेपर्वाईचा मारा सहन करीत आहे. दिल्लीत सुलतानी आणि महाराष्ट्रात अस्मानी या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. या चक्रव्यूहात त्याला तसेच ठेवून पंतप्रधान अबुधाबीत ‘अहलान मोदी’च्या आत्मानंदात मग्न आहेत. ‘शेतकरी वाऱ्यावर, पंतप्रधान दौऱ्यावर’ असे हे संकट आहे. त्यातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार कशी, हा खरा प्रश्न आहे”, असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला.