scorecardresearch

कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्याचा कारागृह अधीक्षकावर हल्ला

पत्र्याचा तुकड्याने कैद्याने कारागृह अधीक्षकावर हल्ला केला

prisoner attacks Prison superintendent in Kolhapur Kalamba jail

कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्यावर जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याने बुधवारी हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संजय बेनीप्रसाद मिश्रा (३९) असे याकैद्याचे नाव आहे.

कळंबा कारागृह अधीक्षक इंदुरकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे पाहणी फेरी करत होते. मिश्रा याला ठेवलेल्या बंकर जवळ ते गेले हा प्रकार घडला. दबा धरलेल्या मिश्राने त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्या हातात पत्र्याचा तुकडा होता. त्यांने तो इंदूरकर याच्या गळ्याच्या दिशेने तीन वेळा मारण्याचा करण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे इंदुरकर यांनी सांगितले. या घटनेनंतर वरिष्ठांनी इंदुरकर यांची फोनद्वारे विचारपूस केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prisoner attacks prison superintendent in kolhapur kalamba jail abn