अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एका कैद्याने पलायनाचा प्रयत्न केला. सोमवारी (३१ जानेवारी) संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या कैद्याला पुन्हा जेरबंद केले. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वडखळ येथील एका जिवघेणा हल्ला प्रकरणात आरोपी बिरू महातो या आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र, तो पेण येथे पोलीस कोठडीत असताना पळून गेला. यानंतर पोलिसांनी १२ तासांमध्ये त्याला पुन्हा अटक करत मुसक्या आवळल्या. आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्याला अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. मात्र मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एकदा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
in nagpur Suicide attempt by young man due to family reasons police save him
कौटुंबिक कारणातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण देवदुतासारखे धावून आले पोलीस; दरवाजा तोडून…
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

नेमकं काय घडलं?

आरोपी कैदी सोमवारी कारागृहाच्या अंमलदारांना धक्का देऊन पळाला. तो ३५ फुट उंच तटबंदीवरून उडी मारून पसार झाला होता. यामुळे खळबळ उडाली होती. कारागृह पोलीस प्रशासनाने तातडीने याबाबतची वर्दी अलिबाग पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग पोलिसांनी तात्काळ कोबिंग ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी कारागृहाजवळील परिसराची झाडाझडती घेण्यात आली. यानंतर १० मिनिटातच एका घरामागील सरपण ठेवण्याच्या जागेत आरोपी लपलेला आढळून आला.

हेही वाचा : कैद्यांच्या मनात गांधी विचारांची पेरणी

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत.