Prithviraj Chavan on Opposition Leader of Vidhan Sabha : महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे ) २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी (शरद पवार) १० आमदार निवडून आले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या एक दशांश सदस्य असणे आवश्यक असते. राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. पण कोणत्याच पक्षाकडे २९ आमदार नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाष्य केलं आहे. शरद पवारांची आज कराड येथे भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज कराड येथे जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली. उद्याची रणनीती तत्काळ ठरवता येणार नाही. आमच्या नेतृत्त्वाला विनंती केली आहे की दोन दिवसांत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घ्या. तळागाळात काय मतं हे जाणून घेण्याची विनंती केली.”

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

पत्रकार परिषदेतून मांडणार जनतेचे प्रश्न

तसंच, विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत ते म्हणाले, “विधानसभेत आम्हाला विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. त्यामुळे विधिमंडळात फार मोठी लढाई होणार नाही. लोकांचे प्रश्न बाहेरच मांडायचा प्रश्न करू. पत्रकार परिषद आणि बैठका घेण्याचं काम सुरू राहणार.”

हेही वाचा >> यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त? संख्याबळ नसतानाही पूर्वी जनता पक्ष, शेकापला संधी

एकनाथ शिंदे यांची टीका

विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेता बनवण्याएवढंही संख्याबळ राहिलेलं नाही. एवढा मोठा हा विजय आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला डिवचलं आहे.

मविआला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची किती शक्यता?

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. लोकसभेत यूपीएकडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसला २०१४ आणि २०१९ मध्ये विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. हेच सूत्र भाजपकडून विधानसभेत कायम ठेवले जाईल, अशी चिन्हे आहेत.

संख्याबळ नसतानाही भाजपाला मिळालं होतं विरोधी पक्षनेते पद

दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. राज्यातील महायुतीचे सरकार पुरेसे संख्याबळ नसताना किंवा महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का, हा प्रश्न आहे.

Story img Loader