पंढरपुरात परिवहन विभागाकडून खासगी वाहनांची व्यवस्था

कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी परिवहन विभागाच्या वतीने पंढरपूर आगारात खासगी वाहनांची व्यवस्था एसटीच्या तिकीट दरात करण्यात आली आहे.

पंढरपूर आगारात परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली वाहतुक सेवा.

भाविक, प्रवाशांसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी परिवहन विभागाच्या वतीने पंढरपूर आगारात खासगी वाहनांची व्यवस्था एसटीच्या तिकीट दरात करण्यात आली आहे. प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रवाशांसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची कार्तिकी यात्रेच्या तोंडावर गैरसोय होत आहे. कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभाग पूर्ण क्षमतेने काम करीत असून परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने विशेष वाहनांची व्यवस्था पंढरपूर बस स्थानक येथून करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर, सांगोला, मिरज, कुर्डूवाडी, पुणे, बार्शी, औरंगाबाद अशा ठिकाणी वाहने प्रवाशांना घेऊन जात आहेत. प्रामुख्याने कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेगाडय़ांची संख्या भरपूर असल्याने कुर्डूवाडी, सांगोला, मिरज अशा रेल्वे स्थानकापर्यंत खासगी वाहतूक परिवहन विभागाच्या वतीने केली जात आहे.

 खासगी वाहनातून वाहतूक होत असली, तरी देखील सुरक्षा आणि परिवहन विभागाचे सर्व नियमांची अंमलबजावणी करूनच वाहतुकीस परवानगी दिली जात आहे. तसेच एसटी बसच्या तिकीट दराइतकेच प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यतील सर्व बस स्थानकांवर परिवहन विभागाच्या वतीने नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या मार्फत नागरिक तसेच भाविकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे अकारणी केली जात असेल किंवा काही अडचण असल्यास संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही परिवहन अधिकारी गवारे यांनी सांगितले.

आपत्तीजनक प्रसंगामध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक होत असली, तरी देखील करोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रवाशासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणर नाही, याची दक्षता परिवहन विभागाच्या वतीने  घेण्यात आली असल्याचेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गवारे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Private vehicles transport pandharpur ysh

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या