शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “महिलांविषयी अभद्र भाषा वापरण्यात येते हीच भाजपची मानसिकता आहे. असे लोक आपल्या राज्यात सत्तेत होते आणि केंद्रात आजही सरकार बनवून बसले आहेत,” असं मत प्रियांक चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं. त्या गुरुवारी (२६ मे) सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीवरील लज्जास्पद आहे. तुमची बॅग भरा आणि घरी काम करा असं म्हणणं केवळ सुप्रिया सुळेंचा अपमान नाही, तर सर्व महिलांचा अपमान आहे. सुप्रिया सुळे खासदार आहेत, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत. त्यांनी केंद्र सरकारविरोधात कायम आवाज उठवला आहे. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

“अशा अभद्र भाषेचा उपयोग भाजपाच्या नेत्यांची मानसिकता दाखवतं”

“सुप्रिया सुळे यांच्याविषयी अशा अभद्र भाषेचा उपयोग भाजपाच्या नेत्यांची मानसिकता दाखवतं. भाजपाचा विचार महिलाविरोधी आहे. भाजपाचे लोक सुप्रिया सुळेंसारख्या खासदाराबाबत असं बोलू शकतात, तर ते कोणत्याही सामान्य महिलेविषयी काहीही बोलू शकतात. महिला विरोधी विचार करणारे हे लोक राज्यात सरकारमध्ये होते आणि केंद्रात अशा लोकांचं सरकार आहे,” असं मत प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.

“भाजपाकडून सतत सरकार पडेल असे कट कारस्थान केले जाते”

प्रियांका चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, “आमच्या नेत्यांवर इडीसह अनेक संस्थांच्या चौकशा लावल्या जात आहेत. भाजपाकडून सतत सरकार पडेल असे कट कारस्थान केले जात आहे. मात्र, आमचे सरकार पडणार नाही, तर आणखी मजबूत होईल. सरकार पाडण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ते सर्व प्रयत्न हे राज्य सरकार अपयशी झाले आहेत.”

हेही वाचा : “…पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं”; सुप्रिया सुळेंवरील चंद्रकांत पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

“ही जय भवानी आधी आणि नंतर जय शिवाजी म्हणणारी शिवसेना”

“शिवसेनेचा आवाज हा दिल्लीपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्रात योग्य सरकार आलं आहे. हे सरकार महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून भाजपाला टोचत आहे. ही ती शिवसेना आहे, जी जय भवानी आधी म्हणते आणि जय शिवाजी नंतर म्हणते. चंद्रकांत पाटील यांनी सर्व महिलांची माफी मागावी,” अशी मागणी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.