हिंदी चित्रपट निर्माते बोनी कपूर हे चित्रपटाचे शूटिंग संपवून मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांची मोटार ट्रॅक्टरवर आदळून अपघात झाला. या अपघातात बोनी कपूर व ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाले. लोणंद-फलटण रस्त्यावर चांदोबाचा िलब (तरडगाव) येथे हा अपघात झाला.
बोनी कपूर यांच्या ‘तेवर’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या खंडाळा येथे सुरू आहे. यात आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अभिनेता अर्जुन कपूर व अन्य आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत. मागील काही दिवसांपासून त्याचे येथे चित्रीकरण सुरू आहे. काल रात्रीचे शूटिंग संपवून रात्रीच्या मुक्कामासाठी साखरवाडी येथील हॉटेलवर जात असताना चांदोबाचा िलब येथे त्यांची मोटार (क्रमांक- एम एच ०४ एफडब्ल्यू ५४००) ट्रॅक्टरवर आदळली. यात बोनी कपूर आणि ट्रॅक्टरचा चालक विजय गाडे किरकोळ जखमी झाले. तर कपूर यांच्या मोटारीचा चालक बचावला.