लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील एका शेडवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने छापा टाकून ४५ लाख २५ हजार रूपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी गुरुवारु दिली.
           
विशेष भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. स्वामी व श्री. पवार यांनी जुने बुधगाव रोड येथील अलताफ रमजान मुलाणी यांच्या शेडची तपासणी केली असता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पानमसाला व सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला. तसेच शेडच्या समोर उभ्या असलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये देखील पानमसाला व सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला.

आणखी वाचा-सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत, मविआच्या विरोधानंतर महावितरणचं एक पाऊल मागे

अन्न व औषध प्रशासन, सांगलीच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून ४५ लाख २५ हजार ९६० रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा व दोन वाहने (किंमत ५ लाख ५० हजार रूपये) जप्त करुन ताब्यात घेवून शेड सीलबंद करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपासाकरीता शहर पोलीस स्टेशन, सांगली येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prohibited tobacco stock worth rs 45 lakh seized in sangli mrj
Show comments