पुढच्या आठ दिवसांत मंदिरं खुली करा; राज्यभरात विविध ठिकाणी भाजपा आक्रमक

नाशिक, नागपूर, पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत.

करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. तर पुण्यात राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. तर नाशकातही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं आहे. रामकुंड इथल्या मंदिरात शंखनाद आंदोलन करण्यात आलं आहे.

यासोबतच मुंबई, शिर्डी, औरंगाबाद, बुलडाणा आणि अमरावतीसह राज्यभरात भाजपाकडून घंटानाद आणि शंखनाद आंदोलन केलं जात आहे. नागपूरातल्या कोराडी मंदिरातही आंदोलन होत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागपूरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली तर पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Protest for opening of temples by bjp in various parts of maharashtra vsk

ताज्या बातम्या