scorecardresearch

Premium

सातारा : वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा – शिवेंद्रसिंहराजे

वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा अशी विचारणा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदित्य ठाकरेंना केली आहे.

Shivendrasigh raje
सातारा : वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा – शिवेंद्रसिंहराजे (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

वाई : वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा अशी विचारणा साताराच्या राजघराण्याचे सदस्य आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदित्य ठाकरेंना केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोहिमांमध्ये वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामुळे आता भवानी तलवारीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं राज्यात येणार आहेत. मात्र, या वाघनखांच्या मुद्द्यावर आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

shrikant shinde aaditya thackeray
“तू कोण आहे, तुला कशाला…”, एकेरी उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका
Aaditya Thackeray
“पबमधले विषय आणि त्यातला…”, भाजपाचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, “पेग, पेंग्विन आणि पार्टी…”
Uddhav Thackeray
“तूच आहे, तुझ्या अपमानाचा शिल्पकार”; भाजपा आमदाराची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
uddhav thackeray and bhaskar jadhav
“उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका

हेही वाचा – “ठाकरेंबरोबर साखरपुडा झालाय, पण लग्नासाठी दोन भटजी…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या वाघनखांबाबत भाष्य केले आहे. लंडनच्या वस्तुसंग्रहालयात असणारी वाघनखं ही महाराजांनी वापरली होती का? याबाबत सरकारकडे स्पष्टता आहे का असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला होता. यावर आता राजघराण्याचे सदस्य आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदित्य ठाकरेंना वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा अशी विचारणा केली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, वाघनखांबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंकांच्या मागे राजकारण आहे. मुद्दामहून याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी लंडनमधील ती वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करावे, या भावनिक विषयांवर विरोधकांनी राजकारण करू नये, उलट ज्यावेळी ही वाघनखे मुंबईत येतील, त्यावेळी त्यांचे स्वागत करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prove that waghnakh are false ask shivendrasigh raje ssb

First published on: 01-10-2023 at 20:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×