scorecardresearch

Premium

ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण उद्या गुरुवारी (२८ सप्टेंबर) रोजी साजरा होणार आहे.

cm eknath shinde attend national engineers day
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित फोटो)

अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण उद्या गुरुवारी (२८ सप्टेंबर) रोजी साजरा होणार आहे. यामुळे गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचा पोलीस प्रशासनावर ताण येणार आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे. तसेच पोलिसांना गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता यावं. यासाठी २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती या संघटनेनं केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.

maharashtra bjp chief chandrakant bawankule visit satara under meri mati mera desh campaign
सातारा: १२० रुपयात गॅस व प्रति किमी ७० पैसे लिटर गाडी चालणार- चंद्रशेखर बावनकुळें चे भाकीत
pm Modi birthday Gondia
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस गोंदियात ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी…
What Eknath Shinde Said?
“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र क्रमांक एकवर आणला होता, पण..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
cm eknath shinde attend national engineers day
मुंबई महानगरपालिकेत उद्या राष्‍ट्रीय अभियंता दिन सोहळा साजरा करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. ‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Public holiday on friday eid e milad cm eknath shinde announcement rmm

First published on: 27-09-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×