डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे दुसऱ्यांदा निलंबित!

या अगोदर निलंबित करून उस्मानाबाद उपकेंद्रात पाठवले होते

औरंगाबादमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यास दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले. या माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव (आस्थापना) गणेश मंझा यांनी दुजोरा दिला आहे.

संजय शिंदे याने रात्रीच्यावेळी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याची तक्रार एका विद्यार्थिनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आठवडाभरापूर्वी दिली होती. त्यानंतर शिंदेंविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदेला बडतर्फ करा, निलंबित करा, अशी मागणी करत भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, अभाविप आदी संघटना आक्रमक झाल्या होत्या. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी औरंगाबादेत आलेले असताना या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या एका विद्यार्थिनीने निवेदन देऊन संजय शिंदेवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या नंतर आज(शनिवारी) सायंकाळी विद्यापीठाने संजय शिंदेला निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढले.

संजय शिंदे यास यापूर्वी तत्कालीन कुलगुरू प्रा. डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात निलंबित करून उस्मानाबाद उपकेंद्रात पाठवले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Public relations officer of dr babasaheb ambedkar marathwada university sanjay shinde suspended for the second time msr

ताज्या बातम्या