पुण्यात कृषी आंबा महोत्सवाला आग, सर्व स्टॉल्स जळून खाक

पुण्यातील मार्केटयार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी आंबा महोत्सवाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सर्व स्टॉल्स जळून खाक झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

पुण्यातील मार्केटयार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी आंबा महोत्सवाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सर्व स्टॉल्स जळून खाक झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये 50 पेक्षा अधिक स्टॉल्स होते. त्यामुळे महोत्सवात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या लाकडी पेट्या आणि टोपल्याची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

या ठिकाणी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. लाकडी पेट्या, टोपल्या आणि गवतामुळे मोठ्या प्रमाणात असल्याने काही क्षणात सर्व स्टॉल्स आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. चार अग्निशामक गाडीच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune mango festival fire