"पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा..." पुण्यातील 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा | pune pakistan jindabad slogan pfi worker arrested muslim leader ziauddin siddiqui demand leave them free rno news rmm 97 | Loksatta

“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेतल्यानंतर मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलने या वादात उडी घेतली आहे.

“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मुस्लीम तरुणांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थातच पीएफआयच्या सुमारे ४१ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

या घडामोडी घडत असताना मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलने या वादात उडी घेतली आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांना तातडीने सोडा, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू, अशा इशारा मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला आहे. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते.

मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यावेळी म्हणाले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी करोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता औरंगाबादेत विविध जातीधर्मांच्या लोकांची मदत केली. कोविड मृतावर अंत्यसंस्कार केले. केवळ सरकारविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना अटक केली जात आहे. हे खोटे गुन्हे रद्द करुन त्यांची निर्दोष मुक्तता करावी. अशी दडपशाही सहन केली जाणार नाही. आम्ही शांत आहोत, याचा गैरफायदा घेऊ नका. अन्यथा लोकशाही मार्गानि रस्त्यावर उतरू, असा इशारा मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला.

हेही वाचा- पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video

ज्या युवकांना अटक झाली त्यांना आम्ही ओळखतो. ते सर्वजण निर्दोष आहेत. या तरुणांचा दोष काय? असे विचारले असता केवळ वरून आदेश आहेत, असे सांगितले जाते. सीमी संघटनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सिद्दिकी म्हणाले की, मागील २५ वर्षांपूर्वी भारतात सीमी संघटनेवर बंदी आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांना अद्याप न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. तसेच झाकिर नाईक यांच्यावरही बंदी आणण्यात आली. जोपर्यंत न्यायपालिका त्यांना दोषी मानत नाही, तोपर्यंत ते आमच्यासाठी निर्दोष आहेत, अशी प्रतिक्रिया सिद्दीकी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – नाना पटोले

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल
Maharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
Chhatrapati Shivaji Maharaj: तुम्ही महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट, म्हणाले…
“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान
Sania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….
अतिउत्साहीपणा नडला! उर्फी जावेदच्या शरीरावर जखमांच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली…