Pune Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.

Live Updates

Pune District Assembly Election Results Highlights : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

08:55 (IST) 24 Nov 2024

Pune District Nota Votes : पुणे जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना ४७ हजार मतदारांनी नाकारले

पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघामधून ३०३ उमेदवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल आजमावला.

वाचा सविस्तर

03:42 (IST) 24 Nov 2024

Pune District Vidhan Sabha 2024 Result LIve : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला अवघी एक जागा मिळाल्याने नामुष्की

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी पुणे शहरावर भाजपचे वर्चस्व असल्याचे, तर ग्रामीण भागावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाली असून, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला अवघी एक जागा मिळाल्याने नामुष्की पत्करावी लागली आहे. शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी प्रत्येकी एक जागा घेऊन अस्तित्व टिकविले आहे. मनसेला मात्र मतदारांनी साफ नाकारले.

02:20 (IST) 24 Nov 2024

Pune Assembly Election Results : पुणे जिल्ह्यातील चार उमेदवारांना १ लाखांहून अधिक मते

Pune Assembly Election Results : पुणे जिल्ह्यातील खालील चार उमेदवार १ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत.

कोथरुड मतदारसंघ – – चंद्रकांत पाटील (भाजप)- १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजयी

मावळ मतदारसंघ – सुनील शेळके (राष्ट्रवादी) – १ लाख ०८ हजार ५६५ मतांची विजयी

चिंचवड मतदारसंघ – भाजपा उमेदवार शंकर जगताप – ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी

बारामती मतदारसंघ – राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार १ लाख ८९९ मतांनी विजयी

01:29 (IST) 24 Nov 2024

Pune Vidhan Sabha Result Latest Updates Live : सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ बनल्या आमदार

पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सध्या त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

00:23 (IST) 24 Nov 2024

Pune Kothrud Vidhan Sabha 2024 Result Live Updates: कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील यांना ‘बाहेरचा’ उमेदवार शिक्का पुसण्यात यश

कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून ॲड. किशोर शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते. सन २०१४ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने खरी लढत भाजप-शिवसेनेत होईल आणि त्यामध्ये मनसेची मते निर्णायक ठरतील, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, लढत एकतर्फीच झाली. पाटील यांना १ लाख ५९ हजार २३४ मते मिळाली तर, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोकाटे यांची मते ४७ हजार १९३ पर्यंत मर्यादित राहिली. शिंदे यांना १८ हजार १०५ मते मिळाली. सन २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांना पंचवीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी पाटील हे कोथरूड बाहेरचे उमेदवार असल्याचा मुद्दा चर्चेचा ठरला होता. पण यंदा चंद्रकांत पाटील यांना ‘बाहेरचा’ उमेदवार शिक्का पुसण्यात यश मिळाले आहे.

23:28 (IST) 23 Nov 2024

Pune Election Results 2024 : ४७ हजार मतदारांनी पुणे जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना नाकारले

Pune Election Results 2024 : पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघामधून ३०३ उमेदवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल आजमावला. मात्र, ४७ हजार ६८५ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारले असल्याचे मतमोजणीमध्ये स्पष्ट झाले आहे.

23:19 (IST) 23 Nov 2024
Pune Election Results 2024 Live Updates: 'युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यायला नको होती. त्यांना शिकू द्यायला हवं होतं' - अजित पवार

Pune Election Results 2024 : बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 'युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यायला नको होती. त्यांना शिकू द्यायला हवं होतं' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

22:47 (IST) 23 Nov 2024
Pune Election Results 2024 Live Updates: ही दोस्ती तुटायची नाय! कसबा विधानसभा मतदारसंघात विजयानंतर रासनेंची खास पोस्ट

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. यानंतर हेमंत रासने यांनी एक्स वर एक खास फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भाजपाचे नते खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रासने यांना खांद्यावर घेतले आहे. या फोटोला 'ही दोस्ती तुटायची नाय!' असं कॅप्शन देण्यात आले आहे.

22:37 (IST) 23 Nov 2024

Pune Election Results 2024 Live Updates: पुणे जिल्ह्यात २१ पैकी ९ जागांवर भाजपाचा विजय

पुणे जिल्ह्यातील २१ पैकी ९ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांनी आठ जागा जिंकल्या असून एका जागेवर शिवसेना (शिंदे) पक्षाला विजय मिळाला आहे.

21:44 (IST) 23 Nov 2024

Kothrud Assembly Election Result : विजयानंतर चंद्रकांत पाटलांचे शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन

विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहेत. यादरम्यान कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपाचे नेते चंद्रकात पाटील यांनी विजयानंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन केले. "महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या वेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्व घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला", अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.

21:16 (IST) 23 Nov 2024
Pune Assembly Election Results : पुणे जिल्ह्यातील चार उमेदवारांना १ लाखांहून अधिक मते

Pune Assembly Election Results : पुणे जिल्ह्यातील खालील चार उमेदवार १ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत.

कोथरुड मतदारसंघ - - चंद्रकांत पाटील (भाजप)- १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजयी

मावळ मतदारसंघ - सुनील शेळके (राष्ट्रवादी) - १ लाख ०८ हजार ५६५ मतांची विजयी

चिंचवड मतदारसंघ - भाजपा उमेदवार शंकर जगताप - ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी

बारामती मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार १ लाख ८९९ मतांनी विजयी

20:47 (IST) 23 Nov 2024
Pune Assembly Election Results : चंद्रकांत पाटील - पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार

Pune Assembly Election Results : कोथरुड मतदारसंघातील चंद्रकांत पाटील (भाजप) १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजयी झाले आहेत. ते पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार आहेत.

20:20 (IST) 23 Nov 2024
Pune District Vidhan Sabha Results 2024 : पुणे जिल्ह्यातील १३ मतदारसंघाचा निकाल

Pune Assembly Election Results Live Updates : पुणे जिल्ह्यातील १३ मतदारसंघाचा निकाल जाणून घ्या.

कसबा

हेमंत रासने (भाजपा)- विजयी

रवींद्र धंगेकर (काँगेस) - पराभूत

गणेश भोकरे, (मनसे )- पराभूत

पर्वती

माधुरी मिसाळ,(भाजपा )- विजयी

अश्विनी कदम, (राष्ट्रवादी -शरद पवार) - पराभूत

पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे, (भाजपा) - विजयी

रमेश बागवे, (काँगेस) - पराभूत

कोथरूड

चंद्रकांत पाटील (भाजपा) - विजयी

चंद्रकांत मोकाटे, (शिवसेना - ठाकरे) - पराभुत

किशोर शिंदे, (मनसे) - पराभूत

शिवाजीनगर

सिद्धार्थ शिरोळे, (भाजपा) - विजयी

दत्ता बहिरट, (काँग्रेस) - पराभूत

हडपसर

चेतन तुपे - (राष्ट्रवादी अजित पवार) - विजयी

प्रशांत जगताप - (राष्ट्रवादी शरद पवार) पराभूत

साईनाथ बाबर, (मनसे )- पराभूत

वडगाव शेरी

सुनील टिंगरे -(राष्ट्रवादी - अजिप पवार) - पराभुत

बापू पठारे- (राष्ट्रवादी शरद पवार) - विजयी

खडकवासला

भीमराव तापकीर, (भाजपा )- विजयी

सचिन दोडके, (राष्ट्रवादी शरद पवार) - पराभूत

मयुरेश वांजळे , (मनसे)- पराभूत

जुन्नर

शरद सोनवणे अपक्ष -विजयी

अतुल बेनके (राष्ट्रवादी - अजित पवार) - पराभूत

सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी -शरद पवार) - पराभूत

आंबेगाव

दिलीप वळसे पाटील -(राष्ट्रवादी - अजित पवार) - विजयी

देवदत्त निकम -(राष्ट्रवादी -शरद पवार) - पराभूत

शिरुर

माउली कटके, (राष्ट्रवादी - अजित पवार) - विजयी

अशोक पवार, (राष्ट्रवादी -शरद पवार) - पराभूत

बारामती

अजित पवार (राष्ट्रवादी - अजित पवार) - विजयी

युगेंद्र पवार (राष्ट्रवादी -शरद पवार) - पराभूत

इंदापूर

दत्ता भरणे, (राष्ट्रवादी - अजित पवार)- विजयी

हर्षवर्धन पाटील, (राष्ट्रवादी - शरद पवार) - पराभूत

पुरंदर

विजय शिवतारे, (शिवसेना एकनाथ शिंदे) -विजयी

संजय जगताप, (काँग्रेस) - पराभूत

भोर

शंकर मांडेकर, (राष्ट्रवादी - अजित पवार)- विजयी.

संग्राम थोपटे, (काँग्रेस) - पराभूत.

खेड

बाबाजी काळे, (शिवसेना ठाकरे) - विजयी.

दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)- पराभूत.

मावळ

सुनील शेळके (राष्ट्रवादी - अजित पवार) - -विजयी

बापू भेगडे अपक्ष - (पराभूत)

पिंपरी

अण्णा बनसोडे, (राष्ट्रवादी - अजित पवार) - विजयी

सुलक्षणा शिलवंत, राष्ट्रवादी शरद पवार - पराभूत

चिंचवड

शंकर जगताप, (भाजप )- विजयी

राहुल कलाटे, (राष्ट्रवादी शरद पवार)- पराभूत

भोसरी

महेश लांडगे, (भाजप) - विजयी

अजित गव्हाणे, (राष्ट्रवादी शरद पवार)- पराभूत

19:47 (IST) 23 Nov 2024
पुणे शहरातील आठ मतदार संघाचा निकाल (Pune Vidhan Sabha Election Results 2024)

Pune Assembly Election Results: पुणे शहरातील आठ मतदार संघाचा निकाल खालीलप्रमाणे -

कसबा

हेमंत रासने (भाजपा)- विजयी

रवींद्र धंगेकर (काँगेस) - पराभूत

गणेश भोकरे, (मनसे )- पराभूत

पर्वती

माधुरी मिसाळ,(भाजपा )- विजयी

अश्विनी कदम, (राष्ट्रवादी -शरद पवार) - पराभूत

पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे, (भाजपा) - विजयी

रमेश बागवे, (काँगेस) - पराभूत

कोथरूड

चंद्रकांत पाटील (भाजपा) - विजयी

चंद्रकांत मोकाटे, (शिवसेना - ठाकरे) - पराभुत

किशोर शिंदे, (मनसे) - पराभूत

शिवाजीनगर

सिद्धार्थ शिरोळे, (भाजपा) - विजयी

दत्ता बहिरट, (काँग्रेस) - पराभूत

हडपसर

चेतन तुपे - (राष्ट्रवादी -अजित पवार) - विजयी

प्रशांत जगताप - (राष्ट्रवादी -शरद पवार) पराभूत

साईनाथ बाबर, (मनसे )- पराभूत

वडगाव शेरी

सुनील टिंगरे -(राष्ट्रवादी - अजिप पवार) - पराभुत

बापू पठारे- (राष्ट्रवादी -शरद पवार) - विजयी

18:52 (IST) 23 Nov 2024

'ईव्हीएम'विरोधात सर्वोच्च न्यायालयात; पराभवानंतर वडगाव शेरीतील उमेदवार आक्रमक

पुणे : ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी केला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचे चलवादींनी सांगितले.

18:40 (IST) 23 Nov 2024

Junnar Vidhan Sabha Election Result 2024 : जुन्नरचे अपक्ष विजेते उमेदवार शरद सोनवणे मुंबईकडे रवाना

Junnar Vidhan Sabha Election Result 2024 : जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले उमेदवार शरद सोनवणे मुंबईकडे रवाना झाले आहे.

18:20 (IST) 23 Nov 2024

पर्वतीत विजयाचा चौकार मारल्यानंतर भाजपच्या माधुरी मिसाळ म्हणाल्या...

पुणे : पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी आव्हान निर्माण केले होते. मिसाळ यांनी तब्बल ५४ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघात तब्बल १ लाख १८ हजार १९३ मतांनी विजय मिळविला. विजयानंतर आमदार मिसाळ म्हणाल्या की, पर्वती मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू-भगिनींनी दिलेले प्रेम, कार्यकर्त्यांची साथ, महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा विश्वास, थोरामोठ्यांचा आशीर्वाद आणि तरुणांचा जोश यामुळेच सलग चौथ्यांदा हा विजय मिळवणे शक्य झाले.

18:00 (IST) 23 Nov 2024

पर्वतीत नामसाधर्म्यामुळे महाविकास आघाडीच्या अश्विनी कदमांना फटका? दोन अपक्ष अश्विनी कदमांना किती मते जाणून घ्या…

पुणे : पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

17:53 (IST) 23 Nov 2024

Chinchwad Assembly Election Result 2024 : चिंचवडमध्ये जगताप कुटुंबाने सत्ता राखली, उमेदवारीसाठी करावा लागला होता संघर्ष

Chinchwad Assembly Election Result Live Update : चिंचवड विधानसभा मतदारसंघ निर्मितीपासून जगताप कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवडमधून लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोनदा कमळावर असे तीन वेळा निवडून आले होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून अश्विनी आणि दीर शंकर यांच्यातील संघर्षाने गृहकलह चव्हाट्यावर आला होता. उमेदवारी नाकारल्याने शंकर जगताप यांच्याकडे भाजप शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली. गृहकलह मिटल्याने चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत.

17:48 (IST) 23 Nov 2024

... तर आम्ही एकमुखाने म्हणू देवेंद्र फडणवीस : चंद्रकांत पाटील

महायुतीमधील मुख्यमंत्री पदाबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पहायला आवडेल? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले " महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. आम्हाला जर केंद्रीय नेतृत्वाने असे म्हटले की, महायुतीमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपद ठरलं, पण आमच्याकडे विचारण्याची सोय नाही. तरी देखील आम्हाला विचारण्यात आले की भाजपकडून मुख्यमंत्री कोण तर आम्ही एकमुखाने म्हणू... देवेंद्र फडणवीस "

17:47 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 : तर आम्ही एकमुखाने म्हणू देवेंद्र फडणवीस : चंद्रकांत पाटील

महायुतीमधील मुख्यमंत्री पदाबाबत चंद्रकांत पाटील यांच विधान

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातील जनतेने बहुमत देऊन 229 जागा दिल्या.तर महाविकास आघाडीला केवळ 46 आणि इतर 13 जण निवडून आले आहे.महायुतीमध्ये भाजप 132, शिंदे गट 56 आणि अजित पवार गटाला 41 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे सध्याच्या घडीला भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या आहेत. यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून भाजपचे जेष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांचा 1 लाख 18 हजार मतांनी पराभव केला.

या विक्रमी मताधिक्याने चंद्रकांत पाटील हे विजयी झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.मुख्यमंत्री म्हणून पहायला आवडेल,त्या प्रश्नावर ते म्हणाले की,महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.आम्हाला जर केंद्रीय नेतृत्वाने असे म्हटले की, महायुतीमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपद ठरल,पण आमच्याकडे विचारण्याची सोय नाही.तरी देखील आम्हाला विचारण्यात आले की, भाजपकडून मुख्यमंत्री कोण तर आम्ही एकमुखाने म्हणू,देवेंद्र फडणवीस अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.त्यामुळे येत्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील,हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

17:23 (IST) 23 Nov 2024

भोर मतदारसंघातून शंकर हिरामण मांडेकर १९, ६३८ मतांनी आघाडीवर

Purandar, Maharashtra Assembly Election Results : भोर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शंकर हिरामण मांडेकर यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संग्राम अनंतराव थोपटे यांना उमेदवार म्हणून निवडलं होतं. सध्या शंकर हिरामण मांडेकर १९, ६३८ मतांनी आघाडीवर आहे.

17:04 (IST) 23 Nov 2024

Purandar, Maharashtra Assembly Election Results :पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना विजयबापू शिवतारे विजयी

Purandar, Maharashtra Assembly Election Results :पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेना विजयबापू शिवतारे यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संजय चंदुकाका जगताप यांना उमेदवार म्हणून निवडलं होतं. या लढतीत विजयबापू शिवतारे यांनी २४, १८८ मतांनी विजय मिळवला आहे.

16:37 (IST) 23 Nov 2024

वडगावशेरीत चुरशीची परंपरा कायम- शहरात ‘तुतारी’ वाजली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) उमेदवार सुनील टिंगरे यांना चार हजार ५६९ मतांनी पराभूत केले.

सविस्तर वाचा...

16:25 (IST) 23 Nov 2024

Pune Assembly Election Results Live Updates in Marathi : अजित पवार मंत्रीपद देतील; विजयानंतर अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास

Pune Assembly Election Results Live Updates in Marathi : पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. अजित पवार मंत्री पदासाठी माझा नक्की विचार करतील. पिंपरी विधानसभा मतदारसंघात मंत्रिपद मिळेल. असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. अण्णा बनसोडे हे विजयी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

15:50 (IST) 23 Nov 2024
‘पर्वती’वर भाजपचा झेंडा! सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ बनल्या आमदार

पुणे : पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

15:29 (IST) 23 Nov 2024

Pimpri Vidhansabha Election 2024 : पिंपरी विधानसभा मतदारसंघ

Pimpri Vidhansabha Election 2024 : पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक झाली आहे. पहिल्या फेरीपासून बनसोडे आघाडीवर होते. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा ३६,६९८ मतांनी पराभव केला आहे. बनसोडे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. पहिल्या फेरीपासूनची आघाडी बनसोडे यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. २० व्या फेरीअखेर बनसोडे यांनी १,०८९४९ मते घेतली.

15:28 (IST) 23 Nov 2024

हडपसर मध्ये निकाल बदलणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांची मागणी

पुणे : निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केल्यानंतर यावर आक्षेप घेत प्रशांत जगताप यांनी या मतदार संघातील मतांची फेर मोजणी करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा...

15:02 (IST) 23 Nov 2024

भोसरीत भाजपचे महेश लांडगे ६४ हजार मतांनी विजयी

14:57 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 :

पुणे हडपसर मतदार संघातून रिकॉउंटिंगची मागणी.. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केली मागणी

ajit pawar ncp vs sharad pawar ncp puneपुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Story img Loader