Pune Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Pune District Assembly Election Results Highlights : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

14:53 (IST) 23 Nov 2024
Junnar Assembly Election Result : जुन्नर विधानसभा मतदारसंघ

Junnar Assembly Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रातील जुन्नर विधानसभा जागेसाठी यावेळी अतुल वल्लभ बेनके यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील सत्यशील सोपानशेठ शेरकर यांना उमेदवारी दिली होती. या ठिकाणच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वल्लभ बेनके यांनी जिंकली होती.

14:52 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 Result

कोथरुड मतदारसंघ

चंद्रकांत पाटील – १ लाख ११ हजार मतांनी विजयी

शिवाजीनगर मतदारसंघ

सिधार्थ शिरोळे – ३६ हजार ८१४ मतांनी विजयी

कसबा पेठ मतदारसंघ

हेमंत रासने – १९ हजार ३२० मतांनी विजयी

पुणे कँटनमेंट मतदारसंघ

सुनील कांबळे – १० हजार ३२० मतांनी विजयी

खडकवासला मतदारसंघ

भीमराव तापकीर – ३७ हजार मतांनी विजयी

हडपसर मतदारसंघ

चेतन तुपे – ६ हजार मतांनी विजयी

वडगावशेरी मतदारसंघ

बापू पठारे – ४ हजार १२२ मतांनी विजयी

पर्वती मतदारसंघ

माधुरी मिसाळ – ५५ हजार मतांनी विजयी

14:40 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : खडकवासला : १९ वी फेरी भीमराव तपकीर ४० हजारांनी पुढे

14:31 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : खडकवासला : १९ वी फेरी भीमराव तपकीर ४० हजारांनी पुढे

14:30 (IST) 23 Nov 2024
Pune Assembly Election Results Live Updates : कसबा मतदारसंघ – भाजपने मिळवली पुन्हा सत्ता

Pune Assembly Election Results Live Updates : पुण्यातील कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानता होता. भाजपचं इथे २५ वर्षे वर्चस्व होतं. १९९५ ते २०१९ पर्यंत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र २०२३ मध्ये भाजपच्या मुक्ता टिळत यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येईल का, याविषयी शंका व्यक्त केली जात होती पण आता पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यास हेमंत रासने यांना मोठे यश आले आहे.

14:16 (IST) 23 Nov 2024

Pune Assembly Election Results Live Updates : आंबेगावातून दिलीप वळसे पाटील विजयी

Pune Assembly Election Results Live Updates : आंबेगावातून राष्ट्रवादी – अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले आहेत.

14:05 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : खडकवासला : १३ वी फेरी भीमराव तापकीर ३५ हजार ६३६ मतांनी आघाडीवर

14:04 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Result 2024 : चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप १ लाख तीन हजार मतांनी विजयी

13:58 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : बापू पठारे वडगाव शेरी मतदारसंघातून चार हजार 833 मतांनी विजयी झाले.

13:57 (IST) 23 Nov 2024

वडगाव शेरीतून बापू पठारे विजयी तर सुनील टिंगरे पराभूत

वडगाव शेरी मतदारसंघातून बापू पठारे विजयी झाले आहेत.

13:57 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : जुन्नरमधून माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार शरद सोनवणे विजयी. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अतुल बेनके पराभूत.

13:57 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी. सुमारे ३६ हजार ८१४ मतांनी विजयी

13:56 (IST) 23 Nov 2024

पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक

पिंपरी : शहरातील राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक झाली आहे.

सविस्तर वाचा…

13:56 (IST) 23 Nov 2024

दौंडमधून राहुल कुल विजयी

Pune Vidhan Sabha Election Results 2024 : दौंड मतदारसंघातून राहुल कुल १४ हजार मतांनी विजयी झाले आहेत.

13:42 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : पर्वती मतदारसंघ १७ फेरी

भाजपच्या माधुरी मिसाळ ५२ हजार मतांनी आघाडीवर

माधुरी मिसाळ (भाजप) : १०६२६८

अश्विनी कदम ( राष्ट्रवादी शरद पवार ) : ५४१३८

13:38 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : भोसरी दहावी फेरी

भाजपचे महेश लांडगे ३२,४२९ मतांनी आघाडीवर

13:38 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : पर्वती मतदारसंघ सोळावी फेरी

भाजपच्या माधुरी मिसाळ ४९ हजार मतांनी आघाडीवर

माधुरी मिसाळ (भाजप) : ९९६९५

अश्विनी कदम ( राष्ट्रवादी शरद पवार ) : ५०९७९

13:36 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात १९व्या फेरीअखेर ३१ हजार ८४७ मतांनी विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर.. काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना ४६ हजार २०३ मते.

13:35 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : चुरशीच्या लढतीत वडगाव शेरी मतदारसंघातून बापू पठारे चार हजार 122 मतांनी विजयी

13:35 (IST) 23 Nov 2024

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार हेमंत रासने

13:32 (IST) 23 Nov 2024

Baramati Vidhan Sabha Election Results 2024 : बारामतीत अजित पवार विजयी, अजित पवार – राष्ट्रवादीला मोठं यश

Baramati Vidhan Sabha Election Results 2024 : बारामती मतदारसंघातून अजित पवार विजयी झाले असून युगेंद्र पवार पराभूत झाले आहे.

13:31 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Result 2024 : चिंचवड २० फेरी

भाजपचे शंकर जगताप ८९ हजार ६४५ मतांनी आघाडीवर

13:29 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार )पक्षाचे उमेदवार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अवघ्या १६६१ मतांनी विजयी.

वळसे पाटील यांना एक लाख ६०९६ मते, तर राष्ट्रवादी ( शरद पवार) पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांना एक लाख ४४३४ मते मिळाली

13:27 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : पिंपरी

एकोणिसाव्या फेरी अखेर अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) ३६,९२० आघाडी

बनसोडे यांना एकूण १०५२६०

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ६५३४०

13:25 (IST) 23 Nov 2024

Pune Assembly Election Result : पुणे – ‘कमी मतदान करणारे शहर’

Pune Assembly Election Results Live Updates : पुणे ही नगरपालिका असल्यापासून काही अपवाद वगळता सरासरी ५० ते ५५ टक्केच मतदार मतदानाचा हक्क बजावत आले आहेत. महापालिका झाल्यानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभेलाही मतदानाचे प्रमाण हे कमीच राहिले आहे. त्यामुळे पुण्यावर ‘कमी मतदान करणारे शहर’ हा शिक्का बसला आहे.

13:14 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : कसबा विधानसभा मतदार संघातून हेमंत रासने विजयी

13:07 (IST) 23 Nov 2024
Pune Vidhan Sabha Election Results 2024 : पुणे जिल्ह्यात ६१.६२ टक्के मतदान, कोण बाजी मारणार?

Pune Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून एकूण २१ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये एकूण ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात ६१.६२ टक्के मतदान झाले आहे.

12:59 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : पर्वती मतदारसंघ चौदावी फेरी

भाजपच्या माधुरी मिसाळ ४२ हजार मतांनी आघाडीवर

माधुरी मिसाळ (भाजप) : ८६४६६

अश्विनी कदम ( राष्ट्रवादी शरद पवार ) : ४४५१५

12:57 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Result 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

२० वी फेरी अखेर

सुनील कांबळे – ७५,७२६

रमेश बागवे – ६२, ४७०

१०,३२० मतांनी कांबळे विजयी

12:54 (IST) 23 Nov 2024

कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांना १२ व्या फेरीअखेर ६२८१२ मते

पर्वती मतदार संघातून १३ व्या फेरी अखेर ४३७९१

वडगाव शेरी मतदारसंघातून १८ व्या फेरी अखेर ७७००

शिवाजीनगर मतदार संघातून १५ वी फेरी अखेर २५३९५ मतांची आघाडी

कसबा विधानसभा मतदारसंघातून २०१६६ मतांची आघाडी

सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या आघाडीने पुढे

पुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.