सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक समितीच्या पुष्पलता संजय बोबडे, तर उपाध्यक्षपदी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे संजीवन रामचंद्र जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा फलटण तालुक्याकडे गेली आहे. उदय शिंदे आणि सिध्देश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली या निवडी करण्यात आल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी शिक्षक बँकेच्या सभागृहामध्ये निवड प्रक्रिया पार पडली. सहायक निबंधक राहुल देशमुख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक समितीचे सिध्देश्वर पुस्तके, उदय शिंदे, सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली किरण यादव, सुरेश पवार, नवनाथ जाधव, महेंद्र जानुगडे, संजीवन जगदाळे, विशाल कणसे, विजय ढमाळ, संजय संकपाळ, विजय शिर्के, नितीन फरांदे, नितीन शिर्के, पुष्पलता बोबडे आदी १६ संचालक निवडीवेळी एकत्र आले होते. संभाजीराव थोरात आणि बलवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, निशा मुळीक, शहाजी खाडे, ज्ञानोबा ढापरे यांची यावेळी उपस्थिती होती. माजी अध्यक्ष निशा मुळीक व उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासो भोसले यांची यावेळी उपस्थित होते.