मुंबई : राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेतलल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या त्यागाचा विचार केला जाईल. बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देताना प्राधान्यक्रम आहे.

जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण करताना शेतकऱ्यांना आश्वासने दिली जातात पण ती वेळेत पूर्ण होत नाहीत अशी कबुली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.

माळनिरस तालुक्यातील निरा देवघर व गुंजवणी प्रकल्प धरणांचे कालवे कार्यान्वित नसल्याने निरा देवघर प्रकल्पाचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही अशी लक्षवेधी उत्तमराव जाणकर यांनी मांडली. त्यावर विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वानस पूर्ण केली जात नाही असे सांगितले.