scorecardresearch

Premium

नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली? राधाकृष्ण विखे यांचा सवाल

मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यांनतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे.

radhakrishna vikhe patil
संग्रहित

राहाता : मुंबईसह राज्याला असुरक्षित करणाऱ्या व्यक्तींसमवेत आर्थिक लागेबांधे उघड झाल्यानंतरही मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत? असा सवाल भाजपा नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यांनतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र या संदर्भात मुख्यमंत्र्यानी मौन पाळले याचे आश्चर्य वाटत असल्याकडे लक्ष वेधून विखे म्हणाले की, १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेदना अद्यापही कायम आहेत. असंख्य निरापराध माणसे मृत्युमुखी पडल्याच्या स्मृती विरलेल्या नाहीत. या घटनेशी संबंध असलेल्या व्यक्तींशी मंत्री नवाब मलिक यांचे मनी लाँडिरग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक झाली तरीही मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नसतील, तर देशहिताची ही प्रतारणाच म्हणावी लागेल.

jayant patil on chandrashekhar bavankule, jayant patil criticize chandrashekhar bavankule, invitation given to rahul gandhi to come baramati
“…तर बावनकुळेंना दारोदारी का फिरावे लागत आहे?”, जयंत पाटील यांचा टोला
TMC-leader-and-Minister-Rathin-Ghosh
ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई
Aditya-Thackeray-Uday-Samnat
“हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर
CM Eknath Shinde criticised uddhav tackeray
पोटदुखीवाल्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम; पाचोऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे एकएक कारनामे उघड होत आहेत. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शंभर कोटी रुपयांच्या घोटाळय़ातील सहभागामुळे राजीनामा घेणारे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत पाठराखण करीत असल्याकडेही विखे यांनी लक्ष वेधले.

मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर नेमका कोणाचा दबाव आहे? नवाब मलिकांचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी उघड झालेल्या अर्थिक संबंधांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. अशा लोकांना बरोबर घेऊन शिवसेना राज्य करणार का? असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाने मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. यासाठी आंदोलन सुरू केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजपासून रस्त्यावर उतरले आहेत. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही विखे यांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Radhakrishna vikhe patil slams uddhav thackeray over nawab malik resignation issue zws

First published on: 24-02-2022 at 23:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×