रवींद्र जुनारकर लोकसत्ता

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रेडिओ कॉलर लावलेला सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी १६१ नर वाघ कारवा रेंजच्या वनखंड क्रमांक २९० मधील आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळून आला. ही घटना बुधवार, ३० मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वाघाच्या गळ्यातील रेडिओ कॉलर काढण्यासाठी वनविभागाकडून २०१९ पासून प्रयत्न सुरू होते. परंतु त्यात यश आले नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये मिळालेल्या छायाचित्रात वाघाच्या गळ्याभोवती जखम दिसून आली होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, शोध पथकाला बुधवार, ३० मार्च रोजी सकाळी त्याचा मृतदेह नाल्यात आढळला. गळ्याभोवतीच्या जखमेमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षावरून सांगितले जात आहे. वाघाचे अंतर्गत अवयव पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे, असे ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये