scorecardresearch

Premium

राफेल चौकशीची आग लागली फ्रान्समध्ये आणि धूर निघाला दिल्लीत – रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपावर खोचंक टीका केली आहे

Rafale interrogation fire in France And the smoke went up in Delhi says rupali chakankar
(संग्रहित छायाचित्र)

आज (गुरवार) दिल्लीतील नवी दिल्लीतील लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीवरून आता राजकारण पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपावर खोचंक टीका केली आहे. राफेलच्या चौकशीची आग फ्रान्समध्ये लागली आणि धूर दिल्लीत निघाल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. रुपाली चाकणकर सतत ट्विटच्या माध्यमातून भाजपावर टीका करत असतात.

भारताला विक्री केलेल्या ५९ हजार कोटी रुपयांच्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारातील कथित भ्रष्टाचाराची आणि वशिलेबाजीची फ्रान्सने न्यायालयीन चौकशी सुरू केल्याचे वृत्त ‘मीडियापार्ट’ या फ्रान्सस्थित शोध पत्रकारिता संकेतस्थळाने शुक्रवारी दिले. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.

Sharad Pawars meeting in gondia
प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; गोंदियात लवकरच सभा, सभेनंतरच कळणार…
Jayant Patil
“मी बेकायदेशीर? मग माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर…”, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला
sharad pawar express he is still ncp chief in delhi before election commission hearing
मीच राष्ट्रीय अध्यक्ष! निवडणूक आयोगाच्या सुनावणीआधी शरद पवारांनी केले अधोरेखित
Sharad Pawar in Delhi 3
“७० जणांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव दिलं, त्यापैकी…”, दिल्लीतील बैठकीत शरद पवारांचं मोठं विधान

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “राफेलच्या चौकशीची आग फ्रान्समध्ये लागली आणि दिल्लीतल्या CBI कार्यालयातून धूर निघाला. कुछ तो गडबड है..”

नवी दिल्लीतील लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात आज (गुरुवार) सकाळी भीषण आग लागली. पार्किंग एरियाच्या इलेक्ट्रॉनिक खोलीत ही आग लागली. आगीनंतर धूर वाढत असल्याचे पाहून सर्व अधिकारी तत्काळ इमारतीतून बाहेर आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

राहुल गांधी यांनी देखील केली होती टीका

भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवरून राहुल गांधी यांनी “चोर की दाढी…” एवढे तीन शब्दच ट्वीट केले आहेत. याशिवाय, या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील राहुल गांधींनी दिला आहे. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधल्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

नेमकं झालं काय?

फ्रान्समधील Mediapart या शोध पत्रकारिता संकेतस्थळाने राफेल कराराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती केल्याचं वृत्त दिलं आहे. ही चौकशी ‘संवेदनशील’ म्हटली गेली असून या ५९ हजार कोटींच्या करारामध्ये झालेल्या सर्व घडामोडींची चौकशी करण्यात येणार आहे. फ्रेंच पब्लिक प्रॉसिक्युशन सर्विसेसच्या आर्थिक गुन्हे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार गेल्या महिन्यात १४ जून रोजी हा तपास पुन्हा सुरू करण्यात आला. त्या आधारावर आता ही चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचं वृत्त मीडियापार्ट संकेतस्थळाने दिलं आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये पीएनएफच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी या कराराला क्लीनचिट दिली होती. मात्र, आता त्याच अधिकाऱ्याचा कनिष्ठ अधिकारी पीएनएफचा प्रमुख झाला असून त्याने ही चौकशी सुरू करण्याच मंजुरी दिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rafale interrogation fire in france and the smoke went up in delhi says rupali chakankar srk

First published on: 08-07-2021 at 19:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×