Rahuri Assembly By-Election Results 2026 Updates : राज्याच्या राजकारणात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मोठी चर्चा झाली होती. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पहायला मिळाला होता. प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? याची उत्सुकता लागली होती. मात्र, अखेर पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७ उमेदवार होते. यामध्ये भाजपाचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके या तिघांसह चार अपक्ष असे ७ उमेदवार होते. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं. आता राहुरीतील नागरिक नेमकी कोणाला कौल देतात? याचा फैसला झाला आहे. राहुरीच्या निकाल समोर आला असून भाजपाचे अक्षय कर्डिले हे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवरच राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Rahuri By-Election Vote Counting LIVE Updates : राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.
राहुरीत कोणाला किती मते मिळाली?
भाजपाचे अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ४० हजार ९३ मते मिळाली तर त्यांचे लगतचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली. एकूण ४१२ टपाली मतदान झाले. त्यातील २९ मते बाद झाली. कर्डिले यांना २८३ मते मिळाली.
राहुरीत अक्षय कर्डिले यांचा सहज विजय, सर्व प्रतिस्पर्ध्यांची अनामत जप्त
अहिल्यानगर: राहुरी विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजी कर्डिले १ लाख १२ हजार ५८७ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. इतर सर्व ६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गुलाल उधळून जल्लोष केला.
विजयी उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रमाणपत्र स्वीकारलं
पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवार अक्षय कर्डिले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार यादव यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारले. मंत्री विखे यांनी अक्षय कर्डिले यांचा सत्कार केला. तसेच निवडणूक योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल प्रशासनालाही धन्यवाद दिले.
राहुरीमध्ये भाजपाचे अक्षय कर्डिले १ लाख १२ हजार विक्रमी मतांनी विजयी
राहुरी विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाचे उमेदवार अक्षय शिवाजी कर्डिले १ लाख १२ हजार ५८७ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. इतर सर्व ६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गुलाल उधळून जल्लोष केला.
राहुरीत अक्षय कर्डिले यांचा सहज विजय; सर्व प्रतिस्पर्ध्यांची अनामत जप्त
"मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने विजय", राधाकृष्ण विखे यांची अक्षय कर्डिलेंच्या विजयावर प्रतिक्रिया
"अक्षय कर्डिले यांच्या विजयाने आपल्याला मोठा आनंद झाला आहे. अशावेळी स्व.शिवाजी कर्डिले यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या पद्धतीने तसेच सरकारच्या कामगिरीवर राहुरी मतदारसंघातील मतदारांनी शिक्कामोर्तब केले. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा विजय सुकर झाला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस आहे यांना आहे. त्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन निर्णय घेतले. त्याचा परिणाम विजयात झाला", अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.
'विखे यांच्या पालकत्वाच्या भूमिकेमुळे विजय'- आमदार जगताप
'निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांनी पालकत्वाची भूमिका स्वीकारली. त्यातूनच मतदारांनी मोठा कौल दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. मतदारांनी शिवाजी कर्डिले यांच्या कार्याला पसंती दिली आहे', असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
गोविंद मोकाटेंचा किती मतांनी पराभव झाला?
राहुरी विधानसभा निवडणुकी पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी निर्विवाद कौल मिळवत विजय संपादन केला. २७ व्या फेरीअखेर त्यांनी १ लाख ४० हजार ९३ मते मिळवले. तर १ लाख १२ हजार ५९७ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. तसेच गोविंद मोकाटे यांचा तब्बल १ लाख १२ हजार मतांनी पराभव झाला आहे.
राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले किती लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले?
राहुरी विधानसभा निवडणुकी पोटनिवडणुकीतील मतमोजणीचा अखेरच्या टप्प्यात भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी निर्विवाद कौल मिळवत विजय संपादन केला आहे. २७ व्या फेरीअखेर त्यांनी १ लाख ४० हजार ९३ मते मिळवत १ लाख १२ हजार ५९७ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे.
राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले विजयी, शरद पवार गटाला धक्का; गोविंद मोकाटेंचा पराभव
राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून भाजपाच्या अक्षय कर्डिले यांचा एका लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी दणदणीत विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून गोविंद मोकाटे यांचा दारूण पराभव झाला आहे.
"माझे वडील या क्षणी नाहीत, हे...", अक्षय कर्डिलेंची भावुक प्रतिक्रिया
“आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण आहे. आज माझ्या राजकीय प्रवासाची सुरूवात झालेली आहे. पण या क्षणी माझे वडील माझ्याबरोबर नाहीत हे माझं दुर्देव आहे. माझ्या वडिलांनी गेल्या ३० वर्षांत लोकांची काम केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, सर्व सामान्य लोकांमध्ये ते राहिले. त्यांनी त्यांचं आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केलं आणि आज त्याचं फळ म्हणून जनतेने आज मला एकटं सोडलं नाही”, असं अक्षय कर्डिले यांनी म्हटलं आहे.
एक लाख ११ हजार मतांनी राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले विजयी
Akshay Kardile BJP Rahuri Bypoll Result: राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळाली आहेत. भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने स्व. शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक आहे.
राहुरीतील विजयानंतर अक्षय कर्डिलेंची भावुक प्रतिक्रिया; "माझे वडील या क्षणी नाहीत, हे माझं..."
राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून भाजपाच्या अक्षय कर्डिले यांचा एका लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी दणदणीत विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून गोविंद मोकाटे यांचा दारूण पराभव झाला आहे. या विजयानंतर अक्षय कर्डिले यांनी माध्यमांशी संवाद साधत भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कर्डिले काय म्हणाले?
"आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण आहे. आज माझ्या राजकीय प्रवासाची सुरूवात झालेली आहे. पण या क्षणी माझे वडील माझ्याबरोबर नाहीत हे माझं दुर्देव आहे. माझ्या वडिलांनी गेल्या ३० वर्षांत लोकांची काम केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, सर्व सामान्य लोकांमध्ये ते राहिले. त्यांनी त्यांचं आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केलं आणि आज त्याचं फळ म्हणून जनतेने आज मला एकटं सोडलं नाही", असं अक्षय कर्डिले यांनी म्हटलं आहे.
राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले विजयी, शरद पवार गटाला धक्का; गोविंद मोकाटेंचा पराभव
आता राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून भाजपाच्या अक्षय कर्डिले यांचा एका लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी दणदणीत विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून गोविंद मोकाटे यांचा दारूण पराभव झाला आहे.
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले विजयी, शरद पवार गटाला धक्का; गोविंद मोकाटेंचा पराभव
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE Updates : राज्याच्या राजकारणात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मोठी चर्चा झाली होती. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पहायला मिळाला होता. प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? याची उत्सुकता लागली होती. मात्र, अखेर पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही.
या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७ उमेदवार होते. यामध्ये भाजपाचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके या तिघांसह चार अपक्ष असे ७ उमेदवार होते. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं.
दरम्यान, आता राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून भाजपाच्या अक्षय कर्डिले यांचा एका लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी दणदणीत विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून गोविंद मोकाटे यांचा दारूण पराभव झाला आहे.
अक्षय कर्डिले पोहोचले विजयाच्या जवळ
Akshay Kardile BJP Rahuri Bypoll Result: भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपाने स्व. शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक आहे. पहिल्याच निवडणुकीत अक्षय यांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २४ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख २९ हजार ८१४ मते मिळाली असून, एक लाख ३ हजार ४७२ चे मताधिक्य मिळवून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले यांचे मताधिक्य लाखावर
अहिल्यानगर : राहुरी विधानसभा निवडणुकी पोटनिवडणुकीतील मतमोजणीचा अखेरच्या टप्प्यात २५ व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी निर्विवाद कौल मिळवत विजय संपादन केला आहे. २५ व्या फेरीअखेर त्यांनी १ लाख २९ हजार ५३१ मते मिळवत १ लाख ३ हजार २२५ मताधिक्य मिळवले आहे.
मतमोजणीच्या एकूण २७ फेऱ्या होणार आहेत व केवळ १२ हजार १६३ मतांची मोजणी बाकी आहे. नोटाला १४६१ मतदारांनी पसंती दिली. शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २६ हजार २८६ मते मिळाली आहेत.
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरीत २६ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची १ लाख ७ हजार मतांची आघाडी, गोविंद मोकाटेंना धक्का
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले २६ व्या फेरीअखेर १ लाख ७ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे हे पराभवाच्या छायेत आहेत.
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरीत २५ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची १ लाख मतांची आघाडी, गोविंद मोकाटेंना धक्का
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले २५ व्या फेरीअखेर १ लाख मतांनी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे हे पराभवाच्या छायेत आहेत.
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरीत अक्षय कर्डिलेंची मोठी आघाडी, गोविंद मोकाटे पराभवाच्या छायेत
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले २४ व्या फेरीअखेर ९४ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे हे पराभवाच्या छायेत आहेत.
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरीत २४ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची ९६ हजार मतांची आघाडी
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले २४ व्या फेरीअखेर ९४ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना एकूण १ लाख २२ हजार मते मिळाली आहेत. २४ व्या फेरीअखेर गोविंद मोकाटे यांना २५ हजार मते मिळाली आहेत.
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरीत २३ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची ९१ हजार मतांची आघाडी
Rahuri Assembly By-Election Results 2026 LIVE : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले २३ व्या फेरीअखेर ९१ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण १ लाख १६ हजार मते मिळाली आहेत. २३ व्या फेरीअखेर गोविंद मोकाटे यांना २४ हजार मते मिळाली आहेत.
राहुरीत २२ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची ८६ हजार मतांची आघाडी
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी २२ व्या फेरीअखेर ८६ हजार ४८३ चे मताधिक्य मिळवून विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांना एकूण १ लाख ९९९ मते मिळाली आहेत. २२ व्या फेरीअखेर गोविंद मोकाटे यांना २३ हजार मते मिळाली आहेत.
राहुरीत २० व्या फेरीअखेर भाजपाचे अक्षय कर्डिले यांना ७७ हजारांवर मताधिक्य
अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी २० व्या फेरीअखेर ७७ हजार ४८३ चे मताधिक्य मिळवून विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांना एकूण ९९ हजार २२४ मते मिळाली आहेत. विसाव्या फेरीअखेर एकूण झालेल्या १ लाख ८६ हजार ४६३ मतांपैकी आत्तापर्यंत १ लाख ३८ हजार ३७५ मतांची मोजणी झाली आहे. अन्य प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २१ हजार ७४१ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना ५०४९ तर ठाकरे गटाचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांना ७ हजार ९३ मते मिळाली आहेत. टपाली ४११ मतांपैकी अक्षय कर्डिले यांना २८३ तर शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना ५६ मते मिळाली आहेत.
Rahuri Election Result 2026 Live Updates : राहुरीत २० व्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची ७७ हजार मतांची आघाडी, राष्ट्रवादीला धक्का?
Rahuri Election Result 2026 Live Updates : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये २० व्या फेरीअखेर भाजपाचे अक्षय कर्डिले यांना ९९ हजार ५०० मते मिळाली असून त्यांनी ७७ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना आतापर्यंत २१ हजार ७०० मते मिळाली असून ते ७७ हजार ७०० मतांनी पिछाडीवर आहेत.
Rahuri Election Result 2026 Live Updates : अक्षय कर्डिलेंची ७४ हजार मतांची आघाडी, गोविंद मोकाटे पिछाडीवर
Rahuri Election Result 2026 Live Updates : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये १९ व्या फेरीअखेर भाजपाचे अक्षय कर्डिले यांना ९४ हजार ९०० मते मिळाली असून त्यांनी ७४ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना आतापर्यंत २० हजार ९०० मते मिळाली असून ते ७४ हजार ४०० मतांनी पिछाडीवर आहेत.
Rahuri By-Election Results 2026: मतदारांचा विश्वास आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू- अक्षय कर्डिले
Rahuri Election Result 2026 Live Updates : अक्षय कर्डिलेंची ७२ हजार मतांची आघाडी, तर गोविंद मोकाटे किती मतांनी पिछाडीवर?
Rahuri Election Result 2026 Live Updates : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये १८ व्या फेरीअखेर भाजपाचे अक्षय कर्डिले यांना ९० हजार मते मिळाली असून त्यांनी ७२ हजार मतांची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना आतापर्यंत १७ हजार ८०० मते मिळाली असून ते ७२ हजार ८०० मतांनी पिछाडीवर आहेत.
Rahuri Election Result 2026 Live Updates : राहुरीत भाजपाच्या अक्षय कर्डिलेंची ७२ हजार मतांची आघाडी
Rahuri Election Result 2026 Live Updates : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये १८ व्या फेरीअखेर भाजपाचे अक्षय कर्डिले यांना ९० हजार मते मिळाली आहेत. तर त्यांनी ७२ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना आतापर्यंत १७ हजार ८०० मते मिळाली आहेत, ते ७२ हजार ८०० मतांनी पिछाडीवर आहेत.
दरम्यान, भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी मोठी आघाडी घेतल्यामुळे ते विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू असल्याचं दिसत आहे.
Akshay Kardile : 'मतदारांचा विश्वास आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू', अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया
Akshay Kardile : अहिल्यानगर : राहुरी मतदार संघातील जनतेने स्व.शिवाजी कर्डिले यांच्याप्रमाणेच माझ्यावर विश्वास दाखवला व मला संधी दिली. हा विश्वास आपण आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया विजयाकडे वाटचाल करणारे भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी माध्यमांशी बोलताना केली. भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. निवडणुकीत भाजपाने स्व.शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी सकाळी राहुरीमध्ये सुरू करण्यात आली. मतमोजणीच्या १६ व्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना एकूण ८० हजार ४२२ मते मिळून ६५ हजार ८५६ चे मताधिक्य मिळवून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
अक्षय कर्डिले काय म्हणाले?
"ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली होती. ही निवडणूक नव्हतीच तर प्रत्येक मतदाराने आपली स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रति असलेली भावना मतातून व्यक्त केलेली आहे. गेली ३० वर्षे कर्डिले यांनी प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते, स्थान मिळवले होते. आज ते आपल्यासमवेत नाहीत. परंतु तेवढेच प्रेम, विश्वास जनतेने माझ्याबद्दल दाखवून मला संधी दिली आहे. आगामी काळात जनतेने दिलेली संधीचा उपयोग आपणही प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करू", असे अक्षय कर्डिले म्हणाले.

राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी जाणून घेऊ. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
