अलिबाग- रायगड जिल्ह्यात महिला बचत गटांना गणराया पावला आहे. गणेशमूर्ती व्यवसायातून बचत गटांनी यंदा तब्बल १५ कोटी ७४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. त्यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे.

उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना गणेशमूर्ती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यात आले होते. याचे सकारात्मक परिणाम आता समोर आले हेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विवीध भागात महिलांकडून १ लाख ५७ हजार ६१२ गणेशमूर्ती तयार करून घेण्यात आला होत्या. ज्यांची गणेशोत्सवा दरम्यान विक्री करण्यात आली. यातून तब्बल १५ कोटी ७४ लक्ष रुपयांची उलाढाल झाली.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना स्वतची खास ओळख प्राप्त झाली असून, गणपती मूर्तींना गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे या व्यवसायातील रोजगार संधी ओळखून पेण आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यातील महिला महिला बचतगटांना सक्रीय करण्यात आले. व्यवसायासाठी उमेद अभियानमार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला, त्यामुळे महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम बनल्या आहेत.

तालुका विक्री केलेल्या मूर्तीची संख्या एकूण उलाढाल

अलिबाग 328 ७ लाख ८१ हजार .
कर्जत 614 १३ लाख ४३ हजार .
खालापूर 950 १९ लाख ७५ हजार
महाड 70 १ लाख ७५ हजार
माणगाव 2 हजार125 ३४ लाख ७५ हजार
मुरुड 2 हजार 060 ३३ लाख ६५ हजार
पेण 1 लाख 49 हजार १४ कोटी २७ लाख