अलिबाग – राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश म्हसळा येथील सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र ठरवले आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

नगरपालिका निवडणुकीपूर्वी म्हसळा नगरपंचायत येथील नगराध्यक्ष फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला होता. या पक्षांतर विरोधात नगराध्यक्ष पर्यंत अब्दुल अजीज बशारत यांच्यासह इतर सात नगरसेवकांनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत याचिका दाखल केल्या होत्या.

या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने सातही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना राष्ट्रवादी यांच्या वादात नगरसेवकांचा राजकीय बळी केल्याची चर्चा म्हसळा परिसरात सुरू झाली आहे
अपात्र ठरवण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये

नगराध्यक्षा फरहिन अ. अजीज बशरत, कमल रवींद्र जाधव, मेहजबिन नदीम दळवी, असहल असलम कादिरी, सुमैया कासम आमदानी, सारा अ. कादीर म्हसलाई, शाहिद सईद जंजिरकर यांचा समावेश आहे.