अलिबाग : रायगड जिल्‍हयातील १५ पंचायत समित्‍यांच्‍या सभापती आणि उपसभापती पदांसाठी आज (दि. 11) निवडणूक होत आहे. जिल्‍हाधिकारी यांनी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून पंचायत समित्‍यांवर कुणाचा झेंडा फडकतो आणि कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रायगडमधील 15 पंचायत समित्यांची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी घेण्‍यात आली. त्‍यानंतर लगेचच 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. निकालामध्‍ये प्रामुख्‍याने महायुतीमधील घटक पक्ष असलेल्‍या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली, तर भाजपचेही ठराविक ठिकाणी वर्चस्व राहिले.

शिवसेना (शिंदे गट) महाड, माणगाव, पोलादपूर, अलिबाग, मुरूडमध्ये आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये सरस ठरला आहे. तसेच, भाजपने पनवेल, पेण, खालापूरमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. एकूणच, रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतील घटक पक्षांनी (शिवसेना व राष्ट्रवादी) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर भाजपने महत्त्वाची पकड मिळवली आहे.

असे आहे सभापतीपदाचे आरक्षण

अनुसूचित जाती – म्हसळा (महिला),

अनुसूचित जमाती – तळा (खुला) , श्रीवर्धन (महिला),

नागरिकांचा मागास प्रवर्ग – महाड (महिला), कर्जत (खुला), माणगाव (खुला), अलिबाग (महिला) ,

सर्वसाधारण प्रवर्ग- पनवेल (महिला), खालापूर (खुला), उरण (खुला), पेण (महिला), मुरुड (खुला), रोहा (महिला), सुधागड (महिला), पोलादपूर (खुला).

बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवरी अर्ज दाखल केले जातील. दुपरी 2 वाजता सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूमीसाठी बैठक होईल. बैठक सुरू झाल्यानंतर उमेदवरी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 10 मिनीटांनी उमेउवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. उमेदवारी आर्ज मागे घेण्यसाठी 10 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास सभापती व उपसभापती पदांसाठी मतदान होईल.