scorecardresearch

पेण येथील ५७ लाख रुपयांच्या एटीएम चोरी प्रकरणाची उकल; रायगड पोलिसांकडून चौघांना अटक

आरोपींनी पेण आणि वडखळ परिसरातील आठ ते दहा एटीएम सेंटर्सची रेकी केली होती. यानंतर सीसीटिव्ही नसलेल्या पेण येथील स्टेट बँकेच्या एटीएम फोडण्याचा निर्णय घेतला होता.

पेण येथील ५७ लाख रुपयांच्या एटीएम चोरी प्रकरणाची उकल; रायगड पोलिसांकडून चौघांना अटक
पेण येथील ५७ लाख रुपयांच्या एटीएम चोरी प्रकरणी रायगड पोलिसांकडून चौघांना अटक

पेण येथील भारतीय स्टेट बँकच्या एटीएम चोरी प्रकणाचा उलगडा करण्यात रायगड पोलीसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आंतरराज्यीय टोळीचा यामुळे उलगडा झाला आहे.

हेही वाचा- महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं…”

१७ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्रीच्या ही घटना घडली होती. चोरट्यांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून ५६ लाख ३४ हजार ८०० रुपयांची रुपयांची रोकड लंपास केली होती. तेव्हापासून या आरोपींचा शोध सुरु होता. अनेक प्रयत्न करूनही गुन्ह्यातील सापडत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांच्या पथकांनी खबऱ्यांमार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरु केले होते.

याच तपासा दरम्यान हरीयाणातील तावडू पोलीस ठाण्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक माहिती मिळाली. या दोघांचा पेण येथील एटीएम चोरी प्रकरणात सहभाग असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला मिळाली, त्यांनी तात्काळ एक पथक हरियाणा येथे रवाना केले. दोन्ही आरोपींची चौकशी केली असता. त्यांनी एटीएम चोरी प्रकरणात सहभाग असल्याचे कबुल केले. यानंतर वसिम अकरम अख्तर हुसेन, माजीद जुम्मा खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत या प्रकरणातील आणखिन दोन आरोपी निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी हसन खान, साकीर अब्दुल रहीम खान या दोघांना अटक केली. हे सर्वजण हरियाणामधील पुन्हाना तालुक्यातील रहिवाशी आहेत.

हेही वाचा- …म्हणून कोकण दौऱ्यावरून आल्यानंतर राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

यातील हसन सिराज खान हा गेली काही वर्ष पेण येथे जेसीबी चालक म्हणून कार्यरत होता. त्याने पेण आणि वडखळ परिसरातील आठ ते दहा एटीएम सेंटर्सची रेकी केली होती. यानंतर सीसीटिव्ही नसलेल्या पेण येथील स्टेट बँकेच्या एटीएम फोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गॅस कटरचा ही व्यवस्था केली होती. पोलीसांनी चौघांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 16:03 IST

संबंधित बातम्या