रायगड : मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ४२ प्रवाशी सुखरूप आहेत.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंना मनोरुग्णालयात…”, फडणवीसांवर एकेरीत टीका केल्यांतर बावनकुळे खवळले

हेही वाचा – ‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

खोपोलीजवळ बोरघाटात रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. बसमधून लग्नाचे वऱ्हाड जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्ससह एक्स्प्रेसवेवरील सर्व यंत्रणा मदत करत आहेत. आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीनंतर विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत सुरू आहे.