अलिबाग- प्रवाशांचे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून एसटी बस चालवल्याची घटना बुधवारी सुधागड पाली येथे समोर आली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चालकाला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. बुधवारी सकाळपासून सुधागड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे आंबा नदीने रौद्ररूप धारण केले होते. भेरव गावाजवळ नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. अशा धोकादायक परिस्थितीत एका एसटी बस चालकाने नदीच्या वाहत्या पाण्यातून पुलावरून बस काढली. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना झाली नाही. चालकाच्या बेजबाबदारपणाबाबात संताप व्यक्त केला जात आहे. हेही वाचा - VIDEO : औदुंबरातील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्णामाईचा प्रवेश हेही वाचा - सोलापूर : करमाळ्यात माहेरी राहणाऱ्या पत्नीचा सुपारी देऊन खून, पतीसह सहाजण अटकेत प्रवाश्यांचे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून पूराच्या पाण्यात एसटी बस चालवल्याची घटना बुधवारी रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चालकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. pic.twitter.com/RWASlM0L6Q— Amit Joshi (@amitjoshitrek) July 24, 2024 ही बस पालीहून बोरगावमार्गे पेण जात होती. सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही बस पाली येथून प्रवाशांना घेऊन निघाली होती. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यानंतर संबधित चालकाला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे.