अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा १७५ कोटींच्या अंतिम सुधारित तर सन २०२६-२७ चा २३५ कोटी ९१ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुली अर्थसंकल्पात दुपटीने वाढ झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनातील सभागृहात शुक्रवारी विशेष सभा झाली त्यात त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. उपाध्यक्ष मधुकर पाटील , समाजकल्याण सभापती नारायण डामसे, महिला व बालकल्याण सभापती सौ. रसिका केणी, सभापती वैकुंठ पाटील, सभापती चंद्रकांत कळंबे , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम , उप मुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे तसेच सर्व विभागप्रमुख या सभेला उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेचा २०२५-२६ सालचा मुळ महसूली अर्थसंकल्प ८५ कोटी ८५ लाख रूपयांचा होता . तो सुधारीत होऊन १७५ कोटींचा ७७ लाख रुपयांचा झाला. मागील वर्षाच्या महसूली मुळ अर्थसंकल्पापेक्षा यांदाच्या अर्थसंकल्पामध्ये यंदा दुपटीने वाढ झाली आहे.
२०२५-२७ चा मुळ महसूली अर्थसंकल्प १७५ कोटी ७५ लाख रुपयांचा आहे. तर भांडवली खर्च ६० रूपयांचा आहे. महसूली व भांडवली असा एकूण २३५ रूपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाचा इतका मोठा मुळ महसूली अर्थसंकल्प मांडण्यात आला.
यंदाच्या अर्थसंकल्पात प्रशासनासाठी १० कोटी ४८ लाख. सामान्य प्रशासानासाठी १७ कोटी ८३ लाख शिक्षण विभागसाठी ११ कोटी ३३ लाख, इमारत व दळणवळणसाठी ३६ कोटी ७१ लाख . पाटबंधारे विभागसाठी ७ कोटी ३५ लाख, सार्वजनिक आरोग्यासाठी ५ कोटी १० लाख .
सार्वजनिक आरोग्य देखभाल दुरूस्तीसाठी २६ कोटी ७० लाख, कृषि विभागासाठी ४ कोटी ४७ लाख. पशूसंवर्धन विभागासाठी ४ कोटी १० लाख. समाज कल्याण ३१ कोटी ३५ लाख, दिव्यांग सक्षमीकरणासाठी ७ कोटी ८३ लाख , महिला व बालकल्याण १५ कोटी ६७ लाख,. सामान्य प्रशासन ६ कोटी ४१ लाख, ग्राम पंचायत ४ कोटी ९८ लाख, समाजकल्याण ३१ कोटी १५ लाख. अर्थ २ कोटी ९५ लाख अशी तरतूद या करण्यात आली आहे.
नाविन्यपूर्ण योजना कोणत्या…
- १ रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना शंभर टक्के विद्यूत जोडणी व वायफाय सुविधा देणार
- २ रायगडावरील शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक आणि पुण्यतिथी सोहळ्यासाठी विशेष तरतूद,
- ३ अंगणवाड्यामधील बालकांना गणवेश पुरवणार,
- ४ महिला बचत गटांना मधुमक्षिका पालन किट पुरविणार
- ५ प्रथमिक शाळांमधील मुलींकरीता सॅनिटरी नॅपकीन पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
- ६ ग्रामीण भागातील भजनी मंडळांना भजनी साहित्य संच पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
- ७ विशेष प्राविण्य मिळवविणार्या खेळाडूंना रायगडरत्न पुरस्कार
