Raigad ZP Election Results LIVE Updates (रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Raigad ZP Election Schedule 2026)
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.
त्यानुसार, रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
| निवडणूक टप्पा | तारीख / वेळ |
|---|---|
| सूचना प्रसिद्धी | १६ जानेवारी |
| नामनिर्देशन स्वीकारणे | १६ जानेवारी ते २१ जानेवारी |
| छाननी | २२ जानेवारी २०२६ |
| माघारीची अंतिम मुदत | २७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत |
| अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप | २७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर |
| मतदान | ७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत |
| मतमोजणी | ९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून |
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Raigad Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)
रायगड जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ५९ निवडणूक विभाग आणि १५ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण ११८ पंचायत समिती वॉर्ड आहेत.
| माहिती | संख्या |
|---|---|
| जिल्हा परिषद एकूण वॉर्ड | ५९ |
| पंचायत समिती (सीट संख्या) | १५ |
| पंचायत समिती एकूण वॉर्ड | ११८ |
Raigad Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा
२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत शेकाप पक्ष २१ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १७ जागांसह राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी राहिली.
रायगड जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर अदिति तटकरे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी शेतकरी कामगार पक्ष (PWP)चे असवाद पाटिल यांनी बाजी मारली होती.
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
|---|---|
| शेकाप | २१ |
| राष्ट्रवादी | १७ |
| शिवसेना | १५ |
| काँग्रेस | ३ |
| भाजप | ३ |
| एकूण | ५९ |
रायगड जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Raigad Zilla Parishad Ward Wise Results 2017)
रायगड जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ५९ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.
| वॉर्ड क्रमांक | विजेत्याचे नाव | विजेत्या पक्षाचे नाव |
|---|---|---|
| ५१ | सायली सुकुमार तोंडलेकर | शिवसेना (SHS) |
| ५२ | प्रगती प्रकाश आडावडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १३ | सहारा संदीप कोळंबे | शिवसेना (SHS) |
| १४ | सुधाकर परशुराम घारे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३४ | प्रियदर्शिनी संजय पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ३७ | राजश्री प्रशांत मिसाळ | शिवसेना (SHS) |
| ५० | बबन श्रीपत मनवे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५५ | मैथिली प्रकाश खेडेकर | शिवसेना (SHS) |
| १ | योगिता जगन पारधी | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| २ | रेश्मा शेखर शेळके | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३ | अमित मोहन जाधव | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४ | राजेश्री एकनाथ भोपी | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ५ | राजू गण पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ६ | पाडीबाई बाळाराम ठाकरे | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ७ | रवींद्र विश्वनाथ पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ८ | ज्ञानेश्वर दशरथ घरत | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ९ | सुदाम तुकाराम पेमारे | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| १० | रेखा भास्कर डिसले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ११ | नारायण राजाराम दामसे | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| १२ | अनुसया रामचंद्र पादीर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| १५ | मोतीराम दत्तात्रय ठोंबरे | शिवसेना (SHS) |
| १६ | उमा संदीप मुंढे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १७ | पद्मा सुरेश पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १८ | नरेश तातूराम पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १९ | रवींद्र आत्माराम देशमुख | शिवसेना (SHS) |
| २० | सुरेश नामदेव खैरे | भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष |
| २१ | दत्तात्रेय भूरय पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| २२ | प्रमोद भास्कर पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| २३ | प्रभाकर वासुदेव म्हात्रे | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| २४ | निलिमा धैर्यशील पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| २५ | महादेव काशीनाथ दिवेकर | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| २६ | विजय राजाराम भोईर | शिवसेना (SHS) |
| २७ | कुंदा वैजनाथ ठाकूर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| २८ | रीना जितेंद्र घरत | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| २९ | बाजीराव दामा परदेशी | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ३० | सुश्रुत सुभाष पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ३१ | चित्रा आस्वाद पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ३२ | दिलीप विठ्ठल भोईर | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ३३ | मानसी महेंद्र दळवी | शिवसेना (SHS) |
| ३५ | सुरेंद्र मोरेश्वर म्हात्रे | शिवसेना (SHS) |
| ३६ | मधु अंबाजी पारधी | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ३८ | नम्रता अजित कासार | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ३९ | किशोर ओटरमल जैन | शिवसेना (SHS) |
| ४० | दयाराम शांताराम पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४१ | अदिती सुनील तटकरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४२ | आस्वाद जयदास पाटील | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
| ४३ | गीता उत्तम जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४४ | बबन महादेव चाचले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४५ | द्रौपदी गंगाराम पवार | शिवसेना (SHS) |
| ४६ | स्वाती अनिल नवगणे | शिवसेना (SHS) |
| ४७ | आरती रमेश मोरे | भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष |
| ४८ | अमृता दिनेश हरवंडकर | शिवसेना (SHS) |
| ४९ | धनश्री नरेश पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५३ | संजय रामचंद्र कचरे | शिवसेना (SHS) |
| ५४ | मनोज वामन काळीजकर | शिवसेना (SHS) |
| ५६ | जितेंद्र राजाराम सावंत | शिवसेना (SHS) |
| ५७ | निकिता निलेश ताथरे | शिवसेना (SHS) |
| ५८ | सुमन काशीनाथ कुंभार | भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष |
| ५९ | चंद्रकांत विष्णू कळंबे | शिवसेना (SHS) |
रायगड जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Raigad ZP Ward Wise Election Results 2026)
रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ५९ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये एकूण ११८ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २,६३४,२०० इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.
महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)
रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे
| क्रमांक | पंचायत समित्यांची नावे |
|---|---|
| १ | पनवेल पंचायत समिती |
| २ | कर्जत पंचायत समिती |
| ३ | खालापूर पंचायत समिती |
| ४ | सुधागड पंचायत समिती |
| ५ | पेण पंचायत समिती |
| ६ | उरण पंचायत समिती |
| ७ | अलिबाग पंचायत समिती |
| ८ | मुरुड पंचायत समिती |
| ९ | रोहा पंचायत समिती |
| १० | तळा पंचायत समिती |
| ११ | माणगाव पंचायत समिती |
| १२ | म्हसळा पंचायत समिती |
| १३ | श्रीवर्धन पंचायत समिती |
| १४ | महाड पंचायत समिती |
| १५ | पोलादपूर पंचायत समिती |
महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे
प्र. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?
उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.
प्र. रायगड जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?
उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.
प्र. रायगड जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?
उ. रायगड जिल्हा परिषदेत एकूण ५९ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात १५ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ११८ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.
प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?
उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.
प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?
उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.
प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?
उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.
प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?
उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?
उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.
प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?
उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.
प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?
उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?
उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.
प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?
उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.
प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?
उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.
प्र. मतदारांना रायगड जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?
उ. मतदारांना रायगड जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.
डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.

