खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती

वाई : फलटणमधून लवकरच विमानसेवा सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. याबरोबरच फलटण- पंढरपूर, फलटण- पुणे- मुंबई मार्गावर रेल्वे सेवा, बुलेट ट्रेन- फलटणमार्गे वळविणे, फलटण राष्ट्रीय महामार्गाद्वारे विकसित करणे आणि  रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच फलटण हवाई मार्गाने जगाशी जोडण्यासाठी आगामी काळात येथे प्रशस्त विमानतळ आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी
pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम

फलटण येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी  ते बोलत होते. फलटण- पंढरपूर लोहमार्ग हा १४०० कोटी रुपयांचा प्रकल्प असून, त्यापैकी ५० टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलावा, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत केंद्राने तीन वेळा याबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. वास्तविक या लोहमार्गाचा लाभ जसा वारकरी भाविकांना होणार आहे, तसा शेतमाल व औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या हिताच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारचा सहभाग असणे आवश्यक आहे.  राज्य सरकारने नकार कायम ठेवल्यास आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाची पूर्तता करणार आहे असे खा रणजितसिंह यांनी सांगितले. लोणंद- फलटण- बारामती या लोहमार्गापैकी लोणंद- फलटण मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाली आहे मात्र  सध्या ती बंद असली तरी लवकरच सुरू होईल. फलटण- लोणंद- पुणे- मुंबई अशी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

फलटण तालुक्यात कांदा आणि आंबा, डाळिंब, द्राक्षे, पेरू वगैरे फळांचे, तसेच फळभाज्या व पाले भाज्यांचे उत्पादन मोठे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून परदेशी पाठविण्याची व्यवस्था नसल्याने आजही शेती उत्पादने कवडीमोलाने विकली जात असून, रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती उत्पादनांचे रास्त भाव मिळाले पाहिजेत, यासाठी कांद्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर आणि आंब्यासह सर्व प्रकारची फळे, फळ भाज्या व पालेभाज्यांचे निर्यातीच्या नियम, निकषांनुसार र्निजतुकीकरण आणि त्यावर प्रक्रिया करून निर्यातक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडे वाढते उसाचे क्षेत्रामुळे वाढलेल्या साखर उत्पादनाची हेळसांड टाळण्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प आपण स्वत: उभारला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना उसाची सर्वाधिक व वेळेवर किंमत देण्याबरोबर इंधनाची गरज भागविणे शक्य होणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.