सांगली : जोरदार वार्‍यासह गुरूवारी सायंकाळी सांगलीत रोहिणीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसाने महापालिकेच्या नालेसफाई कामाचा पंचनामा करीत वाहन चालकांची तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे वीज वाहक तारा तुटल्या, खांब वाकले तर रस्त्यावर पाण्याची तलाव झाले. मात्र, जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज भागात हलका पाउस झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसाने हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या चार दिवसापासून पावसाचे वातावरण तयार होते, मात्र, पावसाची हजेरी खंडित स्वरूपात होत आहे. गुरूवारीही दिवसभर हवेतील तपमान ३९ अंशावर पोहचले असले तरी आकाशात दिवसभर ढगांचा राबता दिसत होता. सायंकाळी चार वाजलेनंतर जोरदार वारे आणि ढगांचा गडगडाट यासह दमदार पावसाने सांगली, विश्रामबाग, मिरज, कुपवाड परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. पंधरा मिनीटाच्या दमदार पर्जन्यवृष्टीनंतर रिमझिम पाउस अर्धा तास सुरू होता. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गणपती पेठ, कापड पेठ हरभट रोडवर पदपथ विक्रेत्यांची स्थिती गंभीर झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in sangli with strong winds amy
First published on: 01-06-2023 at 21:18 IST